– मनपात शहरातील सर्व हॉटेल, व्यवसायी व मंगल कार्यालयाची बैठक
नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका नियमित कार्य करीत आहे. देशपातळीवर नागपूर शहराला स्वच्छ शहराच्या क्रमवारीत आणण्यासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. लॉंन, हॉटेल, मंगलकार्यालय हे बाहेरून येणाऱ्यांसाठी शहराचा आरसा आहे. शहरातील घनकचरा कमी करण्यासाठी लॉंन, हॉटेल, मंगलकार्यालयांनी अधिकाधिक “शून्य कचऱ्यावर आधारित कार्यक्रमांवर भर द्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे मंगळवारी (ता.१३) शहरातील सर्व हॉटेल, लॉन, व्यवसायी व मंगल कार्यालय मालक यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. महाल येथील मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे झालेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह शहरातील १०० हून अधिक हॉटेल, लॉन व मंगल कार्यालयाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत “बल्क वेस्ट जनरेटर” (Bulk Waste Generator (BWG) अर्थात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या अस्थापना यांच्याद्वारे दैनंदिन कचरा कमीत-कमी निर्माण कसा होईल यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, लॉंन, हॉटेल, मंगलकार्यालयांनी अधिकाधिक “शून्य कचऱ्यावर” आधारित कार्यक्रमांवर भर द्यावा म्हणजे, दैनंदिन स्वरुपात आपल्या अस्थापानेवरून कमीत-कमी कचरा कसा निर्माण होईल यावर भर द्यावा, जागीच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे, कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासाठी चार डस्टबीन ठेवावे, ओला कचऱ्यासाठी हिरवा डस्टबीन, सुका कचरासाठी निळा डस्टबीन, सेनेटरी व वैद्यकीय कचऱ्यासाठी लाल डस्टबीन व ई-वेस्ट साठी काळा डस्टबीन चा वापर करावा, विघटनशील अशा ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, आपल्या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून “कंपोस्टिंग” करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी, प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्लास्टिकचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा, आपल्या व जवळपासच्या परिसरात रेड, येलो स्पोट निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अधिकाधिक रीसायकल, रीयुज, रीफुज वर भर द्यावा, याशिवाय केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या नियमांची योग्य अंमलबजावणी करावी असेही आवाहन गोयल यांनी केले.
बैठकीत सर्वप्रथम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी संगणकीय सदरीकाराच्या माध्यमातून “बल्क वेस्ट जनरेटर”, कचरा वर्गीकरण आदी विषयांवर माहिती दिली, तसेच शून्य कचरा कसा करावा, कचऱ्याचे योग्य वर्गीकरणा ऐवजी कचरा एकत्रित होणार नाही याची काळजी कशी घ्यावी याबद्दल विशेष माहिती दिली, डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, बाहेरून येणारे लोक हे हॉटेल सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबतात, त्यामुळे हॉटेल आणि त्याच्या जवळपासचा परिसर बघून त्यांच्या मनात शहराची प्रतिमा निर्माण होते, त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे महत्वाचे आहे. प्रत्येक हॉटेल आणि लॉंन मालकांनी त्यांच्या ठिकाणी “कंपोस्टिंग” आणि ग्रीस ड्रोप ची सोय करायला हवी असे आवाहन ही डॉ. महल्ले यांनी यावेळी केले. बैठकीमध्ये विविध प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या यात लॉंन मालकांकडून श्री. दीपक अरोरा आणि ताहीर शेख यांनी आपल्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष सोनी यांनी केले.
नागपुर महानगर विकास प्राधिकरण और प्रदुषन नियंत्रण मंडल के अधिकारी के मिलिभत से मे बड रहा जल प्रदुषण और ध्वनी प्रदूषण
– नफीस शेख (पर्यावरणनामा रिसर्च फोरम नागपूर)