संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे तालुका विधी सेवा समिती कामठी च्या विद्यमाने आजनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबीर नुकतेच पार पडले.
याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे ऍड पंकज यादव, ऍड रिना गणवीर,ऍड संदीप अढावू यांनी संबोधन करताना ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार ,महिला आणि बालकांचे अधिकार, याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.तसेच मुलींविषयी घडत असलेले लैंगिक अपराधिक कायद्याबाबत सविस्तर अशी माहिती देऊन कायदेविषयक जनजागृती केली शिवाय विधी सेवा प्राधिकरण द्वारा शासनामार्फत मोफत वकिल सेवा उपलब्ध असल्याचेही सांगितले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबाबत प्रोत्साहन करीत विधी सेवा प्राधिकरण द्वारा राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी आजनी ग्रामपंचायत सरपंच जीवतोडे, उपसरपंच दवंडे, ग्रा प सदस्यगण तसेच विधी सेवा समिती चे ऍड रिना गणवीर,ऍड पंकज यादव ,ऍड संदीप अढाऊ उपस्थित होते.