शहरातील प्रभाग निहाय “सखोल स्वच्छता मोहिमस” प्रारंभ

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या दिशेने पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील प्रभागनिहाय “सखोल स्वच्छता मोहिम”ला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मागर्दर्शनात “सखोल स्वच्छता मोहिम” राबविण्यात येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये “सखोल स्वच्छता मोहीम” राबविण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवार २२ जानेवारी पासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

येत्या १ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, फुटपाथ स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावर पाणी साचणार नाही याची खातरजमा करून फायरेक्स/डिस्लजिंग/वॉटर टँकर वापरून रस्ते साफ करण्यात येत आहे. मोहीमे दरम्यान निर्माण होणारा गाळ स्वतंत्रपणे गोळा करण्यात येत असून, रस्ते आणि पदपथावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहे, स्वच्छता मोहीमेत कोणताही अडथळा येणार नाही या दृष्टीने रस्ते व रस्त्या लगतच्या जागा अतिक्रमण मुक्त करण्यात येत आहे. नियमित पार्किंगसाठी रस्त्यावर विषम/सम तारखेची पार्किंग सुरू करण्यात येत आहे. सर्व प्रभागात सीवरेज/स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन (नाला)/वीज/टेलिफोन/ब्रॉडबँड चेंबर्स योग्य स्थितीत असल्याची खात्री करण्यात येत आहे. रस्ते दुभाजक दुरुस्त करण्यात येत आहेत आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यात येत आहे, तसेच जेथे शक्य असेल तेथे सुशोभीकरण करण्यात येत आहे. फूटपाथ आणि मध्यभागावरील कर्ब स्टोन पूर्णपणे स्वच्छ करण्यात येत आहे. पान व गुटखा खाऊन फुटपाथवर/रस्त्यांवर थुंकलेली जागा स्वच्छ करण्यात येत आहे.

“सखोल स्वच्छता मोहिमेद्वारा सार्वजनिक आरोग्य सुधारेल, पर्यावरणाचे रक्षण होईल, नागरी भागामध्ये वाढत्या प्रदुषणाला आळा बसेल तसेच नागपूर, स्वच्छ सुंदर व स्वस्थ होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.

*२२ व २३ जानेवारी रोजी खालील परिसारत राबविण्यात आली मोहीम*

धंतोली – सरस्वती नगार, तकिया. काँग्रेस नगर, रहाटे कॉलनी, कारागृह परिसर

रामदासपेठ- काचीपुरा, लेंद्रां पार्क, दगडी पार्क, शिवाजीनगर शंकरनगर

हनुमाननगरः- चंदननगर, महेश कॉलनी, पीटीएस क्वार्टर, वकीलपेठ

मनीषनगर – नरेंद्रनगर अंडरब्रिज, तुकाराम सभागृह, फ्रेंडस सोसायटी, रुद्रबार टी पॉईट, रेल्वे क्रॉसिंग, अरविंद- उज्ज्वल-विजयानंद सोसायटी

नंदनवन:- नंदनवन झोपडपट्टी, नंदनवन कॉलनी, सद्भावना नगर, श्रीनगर, कवेलु क्वार्टर

मोमिनपुरा:- मोमिनपुरा परिसर, अन्सार नगर परिसर, डोबी नगर, बोरियापुरा

पाचपावली ठक्कर ग्राम:- लाडपुरा, बापु बसोड चौक, महाजनपुरा, बांग्लादेश: पोलीस चौकी, कलकत्ता रेल्वे लाईन.

देशपांडे लेआउट.- त्रिमूर्तीनगर, वर्धमाननगर, ईस्ट वर्धमाननगर, प्रजापती चौक, सी.ए.रोड

ठवरे कॉलनी:- जुनी ठवरे कॉलनी, रिपब्लीकन नगर, बाराखोली

अनंत नगरः- अवस्थीनगर, दिनशॉ फॅक्टरी, बोरगांव काटोलनाका, फ्रेंडस कॉलनी

NewsToday24x7

Next Post

ऍप एक, सुविधा अनेक, महावितरणच्या सेवा आता आपल्या बोटावर!

Wed Jan 24 , 2024
नागपूर :- विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा आपल्या बोटावर असलेल्या महावितरणच्या मोबाईल ॲपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून केवळ गुगल प्ले वरुन मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्याची संख्या 50 लाखांपेक्षा अधिक असून ॲपलच्या ‘ॲप स्टोर्स’ वरुन देखील लाखोच्या संख्य्ने महावितरण मोबाईल ॲप डाऊन लोड करण्यात आले आहे. ॲप डाऊनलोड करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com