प्रशासक ऐवजी विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पूर्ववत करा !

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी – तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक येत्या ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यासाठी लवकरच प्रशासक नियुक्त होणार आहे तर ओबीसी जनगणना व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार नोंदणी ला लागलेल्या वेळेनुसार ठराविक वेळेत निवडणूक घेण्यात निवडणूक आयोग असमर्थ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या पुढील 3 महिन्यापर्यंत समोर जाऊ शकतात त्या विषयाच्या अनुषंगाने कामठी तालुका सरपंच संघटनाच्या नेतृत्वात तालुक्यातील सरपंच संघटनेच्या सदस्यांनी पत्र परिषद घेऊन सदर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेध करून मागील कार्यकाळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निर्णयाच्या धर्तीवर जनगणना मतदार नोंदणी व ओबीसी आरक्षण जोपर्यंत निर्धारित होत नाही तोपर्यंत प्रशासक नियुक्त न करता सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पूर्ववत कायम ठेवावे या आशयाच्या माध्यमातून पत्र परिषद घेण्यात आली होती. या विषयाचे निवेदन काही दिवसातच निवडणूक आयोग तहसीलदार गटविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहे. जर संबंधित विषयाचे समाधान झाले नाही तर कामठी तालुक्यात सरपंच संघटनेद्वारे जय स्तंभ चौक येथून मूक मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे कामठी तालुका सरपंच संघटना संघाचे अध्यक्ष बंडू कापसे यांनी दिला आहे. याप्रसंगी कामठी तालुक्यातील जाखेगावचे सरपंच राजेश्वर आखरे ,भिलगाव चे शितल पाटील,भुगाव च्या चंदा आंबिलडुके , वनिता इंगोले , रवी पारधी , सुवर्णा साबळे, प्रांजल वाघ, मंगला कारेमोरे , शालू मोहोड, चंदू केवट, भावना चांभारे, भगवान कोरडे, आरती शहाणे , नंदा जामगडे, सुनील दूधपचारे,यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीची पळवणूक..

Sun Oct 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहून वडीलासह स्वगृही जाण्यासाठी कामठी रेल्वे स्टेशन वर आलेल्या एका 17 वर्षोय अल्पवयीन मुलीची पळवणूक झाल्याची घटना काल सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!