60 हजार रुपयांची लाच घेताना भू कर मापक चतुर्भुज..

 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पावनगाव गावातील भूमापन क्र 40/1 मधील 3.27 हॅकटर जमिनीचे पोट हिस्से करून त्याची क प्रत देण्यासाठी भूमी अभिलेख विभाग कामठी येथे कार्यरत भु कर मापक कर्मचारी वैभव अशोकराव पळसापुरे यांनी पडताळणी च्या वेळी 60 हजार रूपयाची लाचेची मागणी करून 60 हजार रूपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्वरित धाड घालून लाचखोर वैभव पळसापुरे वय 51 वर्षे ला ताब्यात घेत त्याच्याकडील लाचेची रक्कम 60 हजार रुपये ताब्यात घेत त्या विरुद्ध वाठोडा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्लेखनीय आहे की सदर लाच प्रकरणात तक्रारदाराने पावनगाव येथे त्याच्या पत्नी व साळी च्या नावावर असलेल्या मौजा पावनगाव येथील भूमापन क्र 40/1 मधील 3.37 हॅकटर जमिनीचे पोट हिस्से करून त्याची क प्रत देण्याची मागणी केली असता सदर आरोपी भू कर मापक वैभव पळसापुरे ने 60 हजार रुपयांची मागणी केली असता सदर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने योग्यरीत्या सापळा रचून त्वरित धाड घालून लाचेच्या रकमेसह अटक केले.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र नागपूर चे पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान,अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर,पोलीस निरीक्षक उज्वला मडावी,नापोशी महेश सेलोकर,पंकज अवचट,प्रफुल बांगडे,सचिन किन्हेकर,चालक मपोशी प्रिया नेवारे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न

Thu Aug 22 , 2024
– स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल – राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुंबई :- गेल्या दहा वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची महासत्ता झाला असून २०३० पर्यंत तिसरी मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केल्या जात असून स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत व सर्वसमावेशक होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com