संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-आद्य शिक्षिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सवित्रीमाईंचे प्रगतीशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हीच खरी काळाची गरज असल्याचे मौलिक प्रतिपादन हाजी नसीम अब्बास यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे मार्गदर्शीत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती कामठी व प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने कामठी बस स्टँड जवळील पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .याप्रसंगी हाजी नसीम अब्बास यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांचा विजय असो असा जयघोषसुद्धा करण्यात आला.याप्रसंगी खैरी ग्रा प चे माजी सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, माजी नगरसेवक विकास रंगारी, माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे,प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक प्रमोद खोब्रागडे,राजेश गजभिये,कोमल लेंढारे,गीतेश सुखदेवें,आशिष मेश्राम,आनंद गेडाम,कृष्णा पटेल, नीतू दुबे,सलीम भाई, मंगेश खांडेकर, सुनील चहांदे,सुमित गेडाम,दुर्गेश शेंडे, मनोज रंगारी, गंगा वंजारी,विजय जैस्वाल, शकील भाई,सलमान अब्बास,राजन मेश्राम,धीरज गजभिये, अनिल कुरील आदी उपस्थित होते.