आजनी मार्गावरील परमात्मा एक भवनात कोजागिरी कार्यक्रम उत्साहात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावाच्या विश्रांती नंतर यावर्षी आजनी मार्गावरील परमात्मा एक भवनात कोजागिरी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.    हा कोजागिरी कार्यक्रम 15 ऑक्टोबर ला परमपुज्य परमात्मा एक सेवक मानव सेवा संस्था कामठीच्या वतीने आजनी मार्गावरील परमात्मा एक भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत दुपारी हवनकार्य,भजन,लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य संगीत कार्यक्रम व सार्वजनिक भोजन वितरण तदनंतर दूध वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव नारनवरे व ज्येष्ठ मार्गदर्शिका सरस्वती मोहतुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून कार्यक्रमात 2000 पेक्षा जास्त सेवक,सेविकांनी सहभाग नोंदविला होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आसाराम हलमारे, प्रदीप भोकरे, हरीश भोयर, मनीष तुमसरे, गंगाधर सावरकर, रवी मोहतुरे, मुकेश लोखंडे, विक्की गजबे, उके,बोंद्रे यासह समस्त सेवक सेविकानी मोलाचे सहकार्य केले तर या कार्यक्रमातून मानव धर्माच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा परिषदेत केदारांचे निर्विवाद वर्चस्व, अध्यक्ष पदी कोक्कड्डे तर उपाध्यक्ष पदी कुंदा राऊत

Mon Oct 17 , 2022
नागपूर :- नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता झालेल्या निवडणूकी दरम्यान मागील २ ते ३ दिवसापासून मोठ्या नाट्यकीय घडामोडी घडत असतांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी आपल्या चाणाक्ष अश्या व्यूहरचनेने विरोधकांना चारही मुंड्या चित करीत अध्यक्षपदी पाटनसावंगी सर्कल च्या मुक्ता कोक्कड्डे व उपाध्यक्षपदी गोधणी सर्कलच्या कुंदा राऊत यांनी निवड करण्यात आली. मागील काही दिवसांपासून काँग्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!