आजनी मार्गावरील परमात्मा एक भवनात कोजागिरी कार्यक्रम उत्साहात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावाच्या विश्रांती नंतर यावर्षी आजनी मार्गावरील परमात्मा एक भवनात कोजागिरी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.    हा कोजागिरी कार्यक्रम 15 ऑक्टोबर ला परमपुज्य परमात्मा एक सेवक मानव सेवा संस्था कामठीच्या वतीने आजनी मार्गावरील परमात्मा एक भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत दुपारी हवनकार्य,भजन,लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य संगीत कार्यक्रम व सार्वजनिक भोजन वितरण तदनंतर दूध वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव नारनवरे व ज्येष्ठ मार्गदर्शिका सरस्वती मोहतुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून कार्यक्रमात 2000 पेक्षा जास्त सेवक,सेविकांनी सहभाग नोंदविला होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आसाराम हलमारे, प्रदीप भोकरे, हरीश भोयर, मनीष तुमसरे, गंगाधर सावरकर, रवी मोहतुरे, मुकेश लोखंडे, विक्की गजबे, उके,बोंद्रे यासह समस्त सेवक सेविकानी मोलाचे सहकार्य केले तर या कार्यक्रमातून मानव धर्माच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यात आला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com