– अति उत्कृश्ट कामगिरी बद्दल पोलीस आयुक्तनी पो.स्टे. पाचपावलीचे तपास पथक यांना 75,000/- रु., गुन्हे शाखेचे घरफोडी विरोधी पथक व सायबर पथक यांना 75,000/- रु. तसेच सि.ओ.सी. पथक यांना 50,000/- रु., नविन कामठीचे बिट मार्शल क्र. 3 यांना प्रत्येकी 50,000/- रु. याप्रमणे 2,00,000/- रु. असा एकूण केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबाबत 4,00,000/- रु. चे बक्षिस देण्यात आले.
नागपुर – दिनांक 16/04/2022 रोजी 15ः55 वा ते 16ः00 वा दरम्यान कमाल चौक ते गोळीबार चौक कडे जाणारे पाचपावली उड्डाण पुलावरून जात असतांना फिर्यादी नामे पुर्वाग केतन कामदार वय 19 वर्ष रा. फ्लॅट नं. 708, मंगलम श्रघ्दा अपार्टमेंन्ट, गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर, नागपूर यांचे वडील केतन बटुकभाई कामदार वय 48 वर्ष हे .
कमाल चौक ते गोळीबार चौक कडे जात असतांना तीन अनोळखी आरोपीतांनी केतन बटुकभाई कामदार थांबवून जबरीने त्याचे जवळील मोपेड वाहनच्या डिक्कीत असलेले सोन्याचे दागिने वजन अं. 400-500 ग्रॅम, 03 किलो चांदीचे दागिने हिसकण्याचा प्रयत्न केला. मोपेड वाहनाच्या डिक्कीतील सोने चांदीचे दागिने देण्यास विरोध केला असता अज्ञात आरोपीतांनी केतन बटुकभाई कामदार यांच्या वर चाकुने वार करून जखमी केले तसेच केतन बटुकभाई कामदार यांच्या ताब्यातुन एक मोपेड वाहन किं. अं. 40,000/- रू, सोन्याचे दागिने किं. अं. 20,00,000/- रू, चांदीचे दागिने किं. अं. 2,00,000/- एक वन प्लस मोबाईल किं. अं. 30,000/- असा एकुण 22,70,000/- रू चा मुद्येमाल जबरीने हिसकावून चोरून नेल्याचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन पाचपावली, नागपूर येथे अप. क्र 515/22 कलम 394,397,34 भादवि चा गुन्हा नोंद असुन तपासात आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त यांनी व त्याच्या समवेत पाचपावली पोलीस स्टेशनचे तपास पथक पोउपनि जायभाये व त्यांचे तपास पथक यांनी गुन्हा दाखल झाले बरोबर यातील अज्ञात आरोपींचे प्रथमतः नावे निश्पन्न केली. सि.ओ.सी. येथे वाहतुक विभागाचे मा. पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड सोा यांनी व पोउपनि राठोड यांच्या सहकार्यांनी सदर आरोपींचे फुटेज चेक करुन पाचपावली तपास पथकाने दिलेल्या नावाप्रमाणे आरोपींताचे फोटो व सि.सि.टी.व्ही. फुटेज सर्वत्र प्रसारीत केले. गुन्हे शाखा (डिटेक्षन) चे पोलीस उपायुक्त यांनी व सपोनि चौरसीया व त्यांचे पथक आणि गुन्हे शाखेचे पोउपनि झाडोकर व टिम यांनी सदर फुटेज प्रमाणे घडलेल्या घटनेची बारकाईने पाहणी करुन टेक्नीकल डाटा गोळा करुन सदरचे आरोपी हे नविन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्याची पक्की खात्री झाल्याने सपोनि चौरसीया यांच्या गोपनिय माहिती नुसार सदरचे आरोपी हे काल दिंनाक 17.04.2022 रोजी सायंकाळी 17ः30 वा. चे सुमारास रमानगर कामठी रेल्वे क्रॉसींग जवळ असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहचले.
सदरचे आरोपींतानी सपोनि चौरसीया व त्यांचे तपास पथकाला पाहुन तेथुन येरखेडा या भागामध्ये पळुन गेले. यानंतर सपोनि चौरसीया यांनी सदरची माहिती पोलीस उपायुक्त (डिटेक्षन), यांना देवून सरांनी सदरची माहिती पोलीस आयुक्त साहेबांना दिली. त्यानंतर स्वतः पोलीस आयुक्त यांनी वायरलेसवर शहरातील सर्व बिट मार्शलला सदर घटनेची माहिती देवून जे कोणी बिट मार्शल सदर आरोपींना ताब्यात घेतील त्यांना 2,00,000/- रु. चे बक्षिस ऑन ऐअर जाहीर केले. याप्रमाणे शहरातील सर्व बिट मार्शल यांनी कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व परिसर बारकाईने, कसोशीने पिंजुन काढला. त्यावेळी नविन कामठी पोलीस स्टेशनचे बिट मार्शल क्र. 3 कुंदन नंदवंशी, सुरेंद्र शेंद्रे, मनोज गजभिये, रोहण वाघचौरे यांनी सदरचे तिन्ही आरोपी हे मासुमशाह दर्गा, येरखेडा, कामठी येथे बिट मार्शल क्र 1 व 3 यांना मिळुण आले. त्यांनी लगेच सदरची माहिती वरिष्ठांना देवून तात्काळ स्टॉफ बोलवुन घेतले. सदरचे तिन्ही आरोपी नामे 1) अनिकेत उर्फ अन्नु मनोज बरोंडे वय- 19 वर्षे 2) अजय उर्फ बिट्टु राम समसेरिया वय- 19 वर्षे 3) अंकीत हरीराम बिरहा वय- 19 वर्षे सर्व रा. ठक्करग्राम रेल्वे क्रॉसिंग जवळ, पाचपावली, नागपूर असे मुद्देमालासह अटक केले आहे पुढील तपासकामी पो.स्टे पाचपावली यांचे ताब्यात देवून अटक करण्यात आली. यानंतर आरोपी क्र. 4) प्रज्वल राजु विजयकर वय 23 वर्ष रा. बुध्द नगर, नागपूर, 5) श्रेयस राजु विजयकर वय 20 वर्ष रा. बुध्द नगर, नागपूर, 6) कैलास राजुसिंग ठाकुर वय 28 वर्ष रा. वैशाली नगर, नागपूर यांना अटक करण्यात आली.
सदरची कारवाई नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्विती दोरजे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी, अपर पोलीस आयुक्त(उत्तर प्रभाग) नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त(डिटेक्शन) चिन्मय पंडीत, पोलीस उपायुक्त(परि.क्र. 3) गजानन शिवलिंग राजमाने, पोलीस उपायुक्त(परि.क्र5) मनिष कलवानिया, ] पोलीस उपायुक्त(वाहतुक) सारंग आव्हाड, सहा.पोलीस आयुक्त(गुन्हे) रोशन पंडीत, पो.स्टे. पाचपावलीचे वपोनि संजय मेंढे यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा, घरफोडी विरोधी पथकाचे सहाायक पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया, नापोशि रवि अहीर, नापोशि प्रविण रोडे, ना.पो.शि नरेंद्र ठाकुर, पो.शि मतीन बागवान, चा.पो.शि सुधीर पवार, गुन्हे शाखा सायबर युनिटचे पो.उप.नि बलराम झाडोकर, ना.पो.शि सुहास शिंगणे, पो.स्टे. पाचपावली डिबी पथकाचे पोउपनि अविनाश जायभाये, सफौ रहमत शेख, पोहवा हरशचंद्र वालदे, विजेद्र यादव, विजय यादव, नापोशि सुनिल ठाकुर, नितीन वर्मा, ज्ञानेश्वर भोंगेे, प्रकाश राजपल्लीवार, अमित सातपुते, रोशन फुकट, संजय बरेले, पवन भटकर, रमेश मेमनवार, अंकुश राठोड, इमरान खान, वासुदेव जयपुरकर, पोअं. शहनवाज मिर्झा, रूपेश सहारे, गणेश ठाकरे, आशिष बावनकर, नितीन धकाते, तसेच नवीन कामठी येथील बिट मार्शल कुंदन नंदवंशी, सुरेंद्र शेंद्रे, मनोज गजभिये, रोहण वाघचौरे, सीओसीचे पोउपनि राठोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.