नागपूर :-फिर्यादी नामे लल्लु रहीमआले यादव वय ३५ वर्ष रा. क्वार्टर नं १५४ नविन कॉलनी चनकापुर ग्राउंड समोर ता. सावनेर हे मिलन चौक चनकापुर येथील पुजा बार रेस्टॉरेंट येथे मॅनेजर म्हणून काम करतात. फिर्यादी हे पुजा वार रेस्टॉरेंट येथे कामावर हजर असतांना यातील आरोपी नामे १) ओमप्रकाश शिवेदी वय २३ वर्ष २) हर्षित वर्मा वय अंदाजे २४ वर्ष दोन्ही रा. खापरखेडा हे वारमध्ये येवुन वॉवी कहाँ है! असे म्हणुन फिर्यादीचा सोबत असलेला वेटर यास शिवीगाळ करून गल्ल्यात कीती पैसे आहेत असे म्हणुन दोन्ही आरोपी पैकी एका आरोपीने धारधार सत्तुर काढुन फिर्यादीला मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा अंगावर वार करून जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डीवी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचुन आरोपी नामे १) ओमप्रकाश शिवेदी वय २३ वर्ष २) हर्षित वर्मा वय अंदाजे २४ वर्ष दोन्ही रा. खापरखेडा यांना चनकापुर खापरखेडा येथुन ताब्यात घेवुन आज दि. १९/०८/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापरखेडा येथील ठाणेदार पोनि धनाजी जळक, पोउपनि प्रशांत खोब्रागडे, पोहवा शैलेश यादव, प्रफुल राठोड, मुकेश वाघाडे, राजू भोयर, राजकुमार सातुर, कविता गोंडाणे यांनी पार पाडली.