संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 07:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ क्र 5 हद्दीतील जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरी गावात मागील वर्षी दोन मृतदेह आढळल्याची घटना निदर्शनास आली तसेच विनायक नगर येथे मागील ऑकटोबर महिन्यात भालेराव यांच्या घरी चोरी झाली तसेच 22 नोव्हेंबर ला मध्यरात्री अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्र हातात घेत गावात शिरून बंद असलेल्या पोस्ट ऑफिस कार्यालयात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच वेळी एक पांढऱ्या रंगाचे मारुती 800 कार गावातील हनुमान मंदिरा जवळ येऊन कवठा रोड ला जाताना दिसले या सर्व घटना ग्रामपंचायत च्या वतीने लावण्यात आलेल्या सी सिटीव्ही फुटेज मध्ये कॅमेरा बंद आहेत. तसेच गावातील पॉश असलेल्या फॉर्महाऊसवर पोलिसांनी घातलेल्या धाडीतून अनेक कृत्य उघडकीस आणले नुकतेच काही महिन्याआधी या फॉर्म होऊस वर सुरू असलेल्या ओल्या पार्टीसह जुगारावर धाड घालण्यात यश गाठले होते सध्या प्रभाग क्र 2 मध्ये ग्रा प पोटनिवडणूक असून आगामी निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. तेव्हा आगामी काळात यासारख्या घटनांवर आळा बसत कुठलिही अनुचित घटना न घडो व गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्होवो यासाठी खैरी गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यासाठी कित्येकदा पत्रव्यवहार करन्यात आले . गावातील कायदा व सुव्यवस्थेची बाजु गांभीर्याने लक्षात घेत खैरी गावात लवकरात लवकर पोलिस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी सरपंच बंडू कापसे यांनी केली आहे. ही मागणी करून पंचवार्षिक कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर आले तरीसुद्धा पोलीस विभागातर्फे पोलीस चौकी उभारण्यात आली नाही ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
खैरी गाव महामार्गाच्या कडेला असल्याने तसेच या गावातून कवठा, खसाळा तसेच कोराडी कडे जाणारा जलद मार्ग असल्याने कित्येक अवैध व्यावसायिकानी करीत असलेल्या अवैध तस्करीचा मार्ग या गावातून वळविला आहे.सुरक्षात्मक दृष्टिकोनातून ग्रा प तर्फे पुढाकार घेऊन जागोजागी सीसीटीव्ही क्यामेरे लावण्यात आले.गावात दूषित राजकारणाला वेग येत असून आगामी काळातील निवडणुका तसेच गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने लक्षात घेत भावी दृष्टिकोनातून या गावाला गालबोट न लागावे यासाठी पोलीस विभागाकडून गावात पोलीस चौकी उभारून खैरी गावाला उपकृत करावे अशी मागणी खैरी ग्रा प चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी केले आहे.
खैरी गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी केव्हा उभारणार :-सरपंच बंडू कापसे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com