– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 28 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील फॉर्महॉऊस वर विश्रांती थांब्यासाह जुगार अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने यांना मिळताच पोलिसानी त्वरित सापळा रचून गुप्तां फॉर्म हाऊस वर धाड घालण्याची यशस्वी कामगिरी काल रविवारी सायंकाळी 5 दरम्यान केली असून या धाडीतून 21 गर्भश्रीमंत जुगाऱ्याना अटक करीत त्यांच्याकडून 52 ताश पत्ते, नगदी 1 लक्ष 6 हजार 960 रुपये, विविध कंपनीचे मोबाईल किमती 2 लक्ष 11 हजार 300 रुपये, चार चाकी व दुचाकी वाहन अंदाजे किमती 7 लक्ष 10 हजार रुपये असा एकूण 10 लक्ष 28 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खैरी गावातील गुप्तां फॉर्महाऊस मध्ये जवळपास 50 लोकांची पार्टी आयोजित केली असून या पार्टीत मौजमस्तीसह जुगार ही सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस उपनिरीक्षक आकाश माकने यांना मिळताच माकने यांनी डी बी पथक चे संजय गीते व पथक ला सोबत घेऊन सदर फॉर्महाऊस वर यशस्वीरीत्या धाड घातले असता काही जण स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करीत होते , खालच्या माळ्यात काही जण जेवण करीत होते तर दुसऱ्या माळ्यावर जवळपास 21 जण जुगार खेळण्यात व्यस्त होते दरम्यान पोलिसांनी या 21 ही जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यावर गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले.या अटक आरोपीमध्ये गर्भश्रीमंत नागरिकांचा सहभाग असल्याने यांना पोलिसांची कृपा होऊन जुगार गुन्ह्यातून बाहेर काढण्यात यावे यासाठी कित्येक दिग्गजांनी स्वतःच्या ओळखीचा पुरावा दिला मात्र पोलीस उपनिरीक्षक माकने यांनी कुणाच्याही विनंती ला बळी न पडता कायदेशीर कारवाही करीत गुन्ह्याची नोंद केली.
यानुसार अटक 21 आरोपी मध्ये मुख्तार खान एहमंद खान वय 40 वर्षे रा लष्करी बाग , शेख शाहरुख शेख सलीम वय 27 वर्षे रा तहसील, मो जुबेर मोहम्मद याकूब वय 32 वर्षे रा लष्करीबाग, अरशद खान समी उल्ला खान वय 33 वर्षे रा तहसील, रंजित सहारे वय 41 वर्षे रा वैशाली नगर, अब्दुल अजिज समीर अब्दुल गफ्फार वय 30 वर्षे रा लष्करी बाग, जाहीद अली शौकत अली वय 48 वर्षे रा लष्करी बाग, शेख जावेद शेख हनिफ वय 36 वर्षे रा लष्करी बाग, युनूस खान अहमद खान वय 40 वर्षे लष्करी बाग, शेख अक्रम शेख हनिफ वय 33 वर्षे लष्करी बाग, मोहम्मद गुफरान वय 30 वर्षे रा मोमीनपुरा, जिया खान इकबाल खान वय 31 वर्षे, रा तहसील, वसीम अहमद शकीब अहमद वय 32 वर्षे रा टिमकी, सागर शेंदरे वय 38 वर्षे रा लष्करी बाग, बबलू बकसरे वय 47 वर्ष रा लष्करी बाग, कासीम खान इफतेखार खान वय 33 वर्षे रा टिमकी, मोहम्मद अफसर मोहम्मद शाबीर वय 33 वर्षे रा टिमकी, शेख मोसिम शेख कलिम वय वय 31 वर्षे रा पारडी, अदनान खान गयासुद्दीन खान वय 25 वर्षे रा मोमोनपुरा, वसीम खान बसिर खान वय 32 वर्षे रा नवा नकाशा, मोहम्मद शहबाज खान अशपाक खान वय 27 वर्षे रा गांजाखेत, सौरव रामप्रसाद गुप्तां वय 52 वर्षे रा यशोदीप कॉलोनी नागपूर असे आहे.
ही यशस्वी कारवाही डीसीपी मनीष कलवानिया , एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने, सहायक फौजदार मालोकर, डी बी स्कॉड चे संजय गीते,महेश कठाने, श्रीकांत भिष्णुरकर, अंकुश गजभिये, अरविंद झाडे, पवन, ईश्वर, शेळके आदींनी यशस्वीरीत्या राबविली असून पुढील तपास सुरू आहे तर या कारवाहितुन पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने व डी बी स्कॉड चे संजय गीते व पथक चे कौतुक करण्यात येत आहे.
खैरी गावातील जुगार अड्यावर धाड, 21 जुगाऱ्याना अटक,10 लक्ष 28 हजार 260 रुपयाचा मुद्देमाल जप्त
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com