पीएचडी गाईड साठी बुद्धिस्ट स्टुडंट्स चा मोर्चा

नागपूर :-नागपूर विद्यापीठातून पेट (PET) परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी (Ph D) गाईड मिळत नसल्याने नागपूर विद्यापीठाने गाईड उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज पेट परीक्षा पास झालेल्या व पेट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यां द्वारे बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन च्या माध्यमातून उत्तम शेवडे ह्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विधी मंडळावर मोर्चा काढण्यात आला.

हा शिक्षित व पीएच डी धारकांचा मोर्चा दुपारी यशवंत स्टेडियम येथून व्हेरायटी चौक मार्गे, शहीद गोवारी टी पॉईंट, 0 माईल्स येथे पोहोचल्यावर उत्तम शेवडे, नरेश मेश्राम, किशोर भैसारे, मोरेश्वर मंडपे, राहुल शाक्यसिंह ह्यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळा द्वारे मंत्री उदय सामंत ह्यांची भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन देऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मागण्या –

नागपूर विद्यापीठात असलेल्या गाईड च्या कोठ्यात दुप्पट वाढ करावी, गाईड होण्यास पात्र तसेच इच्छुक प्राध्यापकांची त्वरित निवड करावी, आंतरविद्या शाखा अंतर्गत गाईडची व्यवस्था करावी, निवृत्तीच्या वेळेपर्यंत त्यांना गाईड राहण्याची संधी मिळावी, विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या जागावर त्वरित नियुक्ती करावी या प्रमुख पाच मागण्या करण्यात आल्या.

निवेदनात डॉक्टर आंबेडकर विचारधारेचे राहुल शाक्यसिंह, किशोर भैसारे, एडवोकेट माणिक सावंग, एडवोकेट सागर गणवीर, केशव मेश्राम, उल्हास गेडाम, आशा रामटेके, महेंद्र रामटेके, प्रमोद श्रीरामे, बौद्ध अध्ययनचे किशोर रामटेके, पालीचे जगन्नाथ पोहेकर, समाजकार्याचे निखिल बडगे, किस्मत धारगावे, कायद्याचे मोरेश्वर मंडपे, महेंद्र जीवने, सुनील अग्रवाल, नरेंद्र वैद्य, इतिहासाचे राष्ट्रपाल कांबळे, धर्मपाल कांबळे, सामान्य प्रशासनचे राहुल ठाकरे, फाईन आर्ट चे राहुल गावंडे, हॉटेल मॅनेजमेंटचे अमित नंदा आदी विद्यार्थ्यांना गाईड मिळावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

मोर्चात प्रामुख्याने पेट परीक्षेची तयारी करीत असलेले सिद्धार्थ फोपरे, जिंदा भगत, एडवोकेट विलास राऊत, भारती खरे, करुणा रंगारी, दिलीप गायकवाड, हिरालाल मेश्राम यांचे सहित विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com