महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा – विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेची मागणी

संदीप बलविर,प्रतिनिधी

पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन

नागपूर :- महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधणारे,मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारे,महाराष्ट्राचे आराध्य दैवत महापराक्रमी,शूरवीर,छत्रपती शिवाजी महाराज तसेच सत्यशोधक,क्रांतिसूर्य,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील व विश्वरत्न, संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात आक्षेपहार्य विधान करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी याकरिता आज दि २२ डिसेंला बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना येथील विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेच्या वतीने निवेदन दिले.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एका जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विरोधात आक्षेपहार्य विधान केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्त्री शिक्षणाचे प्रणेते,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व विश्वरत्न,संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात आक्षेपहार्य विधान केले त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेचे मन दुखावले आहे.देशातील महापुरुषांच्या विरोधात सतत गरळ ओकणाऱ्या भगतसिंग कोशारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांना राज्याच्या सर्वोच्च पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेचे अध्यक्ष उमेश दखणे, महासचिव हेमचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष वासुदेव चौधरी, सहसचिव, अरविंद नारायने सदस्य राजेश टेंभुर्ने, नरेंद्र पाटील, रवींद्र लोखंडे, डॉक्टर आर एस वाने सर, संजय भुमरकर, रविंद्र फुलझेले, रतन मनवटकर, विजय गणवीर, चंदू चव्हाण, चंदू बोरकर, विनोद मून, अरुण वागदे, सुनील मून, रुपेश जिंदे, राजू कांबळे शिवचरण दहाट, गणेश सोनटक्के आदी सदस्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खंडाळा शिवार कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यु

Thu Dec 22 , 2022
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर बॉयपास रोडवर कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१९) डिसेंबर ला पोलीस हवालदार जयलाल सहारे हे पोस्टे कन्हानला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com