काटोल :- काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला काटोल विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मला विधान सभेवर निवडून पाठविले आहे. विधानसभा सदस्यांना आमदार म्हणून संबोधतात.मात्र मी आपला आमदार नसून कामदार आहे. आपला हा कामदार पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचें स्वप्न साकारण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे मजबूत देशाची पुर्ती साठी महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सहकार्यातून काटोल विधानसभेचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मागील २०वर्षात काटोल नगरपरिषदचे नगराध्यक्ष म्हणून मला जी संधी त्या माध्यमातून काटोल नगर परिषदेचे सर्व अधिकारी, सर्व कामगार यांचे सहकार्यांने काटोल नगर परिषद ही आदर्श नगर परिषद ठरू शकली. या नगर परिषदेचा अनुभव व विकास मला विधानसभेच्या विजयात मोठे योगदान आहे.
आपण मला कामदार केले. आता साडे तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या सोयीसाठी झटावे लागणार आहे. माझ्यावर जसी मोठी जबाबदारी आपण टाकली आहे. त्या साठी माझ्या पेक्षा काटोल नगरपरिषद चे मुख्य प्रशासक , अधिकारी व सर्व विभागाचे कर्मचारी यांचे वर ही मोठी जबाबदारी आली आहे. ती जबाबदारी म्हणजे आपली काटोल नगरपरिषद देशात अव्वल आणण्यासाठी आपली मदत हवी आहे. काटोल नगर परिषदेला देशात अव्वल स्थानावर आणायचे आहे सोबतच काटोल ला जिल्ह्याचा दर्जा मिळवुन द्यायचा आहे. तसेच कोंढाळी नगर पंचायतीचे पायाभूत व मुलभूत सोयी सवलती साठी नियोजन करून ते नियोजन त्वरित बनवून द्यावा काटोल नगर परिषद, तसेच कोंढाळी नगर पंचायती साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सहकार्याने विकास गती वाढविण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे मनोमन काटोल नगरपरिषदचे प्रांगणात काटोल नगरपरिषदेचे अधीकारी व सर्व कर्मचारी, सर्व कर्मचारी संघटना यांचे वतीने काटोल नगरपरिषदेचे मुख्य प्रशासक धनंजय बोरीकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित आमदार चरण सिंह ठाकुर यांच्या सत्काराचे उत्तर देतांना आमदार चरण सिंह ठाकुर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्य प्रशासक धनंजय बोरीकर,प्रा. देविदास कठाणे, जि प सदस्य समीर उमप, कृषी मित्र दिनेश ठाकरे,संजय डांगोरे, किशोर गाढवे, माजी नगरसेवक राठी यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव बारई तर याप्रसंगी आपले मनोगत कैलास खणते अविनाश बरसे नगरपरिषद शाळा क्रमांक दोन चे मुख्याध्यापक भस्मे यांनी व्यक्त केले आभार प्रदर्शन उमेश हेंबाडे उपमुख्याधिकारी नगरपरिषद काटोल यांनी मांडले