संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घ्यावा
कामठी :- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचाराचा व त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यायला पाहिजे स्वच्छतेची सुरुवात गावापासून झाली पाहिजे, गाव सुखी तर देश सुखी याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात त्यांनी दिवसभर झाडलोट केली व रात्री आपल्या कीर्तनातून शिक्षणा बद्दल महत्व सांगत ते अंधश्रद्धा ,जातीयवाद, दैववाद, अज्ञान याबाबत समाजाचे प्रबोधन करून समाज जागृत केल्याचे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका यांनी धोबी समाजाच्या वतीने आयोजित श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यक्त करून संत गाडगेबाबा यांच्या जीवणावर प्रकाश टाकला.यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी महेश कनोजिया,किशोर कनोजिया, कपूर कनोजिया,संजय कनोजिया,रमेश कनोजिया,बंडीवार,नकुन अरगुल्लेवार,विशाल कोतपल्लीवार ,रितेश सरलवार,रोशन क्षीरसागर,राकेश कनोजिया,राजू अरगुल्लेवार,दशरथ गंगाराज,उषा कोंडुलवार,स्वाती कोतपल्लीवार ,सुनीता कोतपल्लीवार, दुर्गा कोंडुलवार,गीता कनोजिया,उषा कनोजिया यासह धोबी समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.