कामठी च्या स्वस्त धान्य दुकानातून तूर, चना डाळ हद्दपार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 31:-सद्यस्थितीत मोफत धान्य वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असून यात फक्त गहू व तांदूळ उपलब्ध आहे मात्र तूर व चना डाळ हद्दपार झाल्याने कामठी च्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये गरिबांसाठी डाळ केव्हा उपलब्ध होईल असा प्रश्न येथील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील शिधापत्रिका धारक विचारत आहेत.
कामठी च्या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील शिधापत्रिका धारकांना रेशन वितरणाची प्रक्रिया निरंतर राबविली जाते .कोविडच्या काळात याच सरकारी स्वस्त धान्य दुकानातुन मिळणाऱ्या अन्न धान्यावर सर्वसामान्य कुटुंबाची संपूर्ण दारोमदार विसंबून होती मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात अनेक पात्र शिधापत्रिका धारकांना गहू तांदूळ यासोबतच गहू व तांदूळ हे धान्य प्रति लाभार्थी पाच किलोप्रमाणे मोफत वितरित करण्यात येत आहे.केवळ दोन ते तीन महिने तूर व चना डाळीचे वाटप करण्यात आले होते .पुरवठा विभागाकडून वेळोवेळी धान्य वितरण करण्याबाबतच्या नवनवीन सूचना येत असतात यामुळे धान्य वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदाराकडे आणि धान्य खरेदी करताना ग्राहकापुढे संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यातील 27 सेवा सहकारी संस्थांची निवडणूक जाहीर

Tue May 31 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 31:-कामठी तालुक्यात एकूण 34 सेवा सहकारी संस्था कार्यरत असून यातील 27 सेवा सहकारी संस्थांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने या संस्थेच्या पुढच्या पाचवर्षासाठी सेवा सहकारी संस्थांच्या संचालक पदाच्या निवडीसाठी नागपूर जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी ने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या 27 सेवा सहकारी संस्थांची निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात येत आहे.आज दोन टप्प्यातील 25 सेवा सहकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com