राज्य शासनाने निर्बंधात सुट दिल्याने नागरिकां मध्ये दिसला उत्साह.
कन्हान : – शहरात व परिसरात होळी सणाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षापासुन शहरात कोरोना प्रादुर्भाव अस ल्याने नागरिकांनी आपल्या घरीच होळी साजरी केली असुन यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव नसुन सुद्धा शासना ने निर्बंध लावल्याने नागरिकांत तीव्र रोष निर्माण होत असल्याने शासनाने निर्बंधात सुट दिल्याने शहरात नागरिकांनी होळी व धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहा त साजरा करण्यात आला.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे थैमान घातल्याने राज्य शासनाचे निर्बंध कडक केल्याने होळी चा सण नागरिकांनी आपल्या घरीच साजरा केला असुन यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असुन सुद्धा राज्य शासनाने निर्बंध लावल्याने नागरिका मध्ये तीव्र रोष निर्माण होत असल्याने शासनाने निर्बंधात सुट दिल्याने नागरिकां मध्ये होळी सणाचा मोठा उत्साह दिसला शहरात व परिसरात होळीचा सण येताच दोन ते तीन दिवसां पुर्वी दुकाने सजल्याने नागरिकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुरूवार (दि.१७) ला होळीच्या दिवशी नागरिकांची दुपार नंतर चहल पहल पाहायला मिळाली असुन सायंकाळी परिसरातील विविध नगरात लाकडांची होळी दहन करण्यात आली . दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि.१८) ला धुलिवंदन च्या दिवशी नागरिकांनी परिसरात डिजे च्या साऊंड मध्ये नाचत गाचत, घरोघरी जाऊन, एकमेकांना गुलाल लावुन होळी च्या शुभेच्छा देत परिसरात होळी व धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला .