सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ३१ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार ( ता. ६ ) रोजी शोध पथकाने ३१ प्रकरणांची नोंद करून ४४,१०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून २४०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 400 दंड वसूल करण्यात आलेला आहे.वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 5 प्रकरणांची नोंद करून रु 22000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायिकांने रस्ता, फूटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००० /- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु २००० दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्ता, फूटपाथ मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/ टाकून कचरा टाकणे/ साठवणे, प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत एका प्रकरणांची नोंद करून रु १००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ३ प्रकरणांची नोंद करून रु ६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ५ प्रकरणांची नोंद करून रु ५००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दिनांक 03/07/2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 10,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा, रोकडे ज्वेलर्स चा अभिनव उपक्रम

Wed Jun 7 , 2023
• काल वटपौर्णिमा ऑन व्हील्स धुमधडाक्यात साजरी झाली • पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महिलांनी केली मेट्रो सफर नागपूर :- रोकडे ज्वेलर्स आणि श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने काल 3 जून रोजी सकाळी 11.30 वाजता ‘वटपौर्णिमा ऑन व्हील’ हा धावत्या माझी मेट्रो ट्रेन मध्ये अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर एकत्र जमत महिलांनी आधी वाडाच्या झाडाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com