कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजली

संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- इ.स.वी.सन २३ मार्च १९३१ साली लाहोल जेल मध्ये भगत सिंह , शिवराम राजगुरु आणि सुखदेव थापर यांना फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात २३ मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो .

कन्हान शहर विकास मंच द्वारे २३ मार्च शहिद दिवस निमित्य श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन तारसा शहिद चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच नवनिर्वाचित सदस्य वसंतराव उरकुडे , मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख , भगत सिंह , शिवराम राजगुरु , सुखदेव थापर यांचा प्रतिमेला आणि शहिद स्मारका वर पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे सह आदि ने शहिद दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारक व शहिदांचा प्रतिमेला पुष्प अर्पित केले आणि दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिदांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , संदीप देशमुख , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , वसंतराव उरकुडे , योगराज आकरे , काशीनाथ कोंडेवार सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

Thu Mar 23 , 2023
ठाणे :- शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com