संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव परिसरातून पिकअप वाहनाने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच या वाहनावर धाड घालून कत्तलीसाठी जात असलेले गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री साडे दहा दरम्यान घडली.आरोपी वाहनचालकाने संधी साधून घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले असून या कारवाहितुन 11 गोवंश जनावरे किमती 1लक्ष 10 हजार रुपये व जप्त पिकअप वाहन क्र एम एच 40 बी एल 1902 किमती 5 लक्ष रुपये असा एकूण 6 लक्ष 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई डीसीपी , एसीपी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनार्थ तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, राजू बागडी, सूचित गजभिये,शैलेश यादव,अश्विन चहांदे, विवेक दोरसेटवार, अमित ताजने यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.