संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – ग्रा.पं. कांद्री येथील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी मानुष्की जपत आपल्या स्वखर्चातुन वॉर्ड क्र.४ कांद्री येथील अपंग मुलगा रितेश प्रसाद या मुलाला लॅपटॉप सप्रेम भेट देत मौलिक सेवाभावी कार्य केले.
रितेश हा एका डोळ्याने आंधळा असून त्याची घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. तो सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभुमी नागपूर येथे शिकत आहे. त्याला शिक्षणाकरिता लॅपटॉपची आव श्यकता होती, परंतु घरची परिस्थिती ही बेताची अस ल्याने तो लॅपटॉप विकत घेऊ शकत नव्हता. अशातच त्याने आपल्या प्रभागातील सदस्य महेश झोडावणे यां च्याशी संपर्क साधुन आपली आपबीती सांगितल्याने महेश झोडावणे यांनी पुढाकर घेऊन सरपंच, उपसरपं च व सर्व सदस्याना ही गोष्ट सांगितली. त्यावर सर्वांनी होकार देऊन मदत करण्यासाठी सर्वांनी हाथ पुढे केले त आणि सर्वांनी मानुष्की जपत आपल्या स्वखर्चातुन रूपये जमा करून गरीब अपंग रितेश प्रसाद या मुला ला लॅपटॉप घेऊन दिला. हे मौलिक सेवाभावी कार्य कांद्री सरपंच बळवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, ग्रा प सदस्य धनराज कारेमोरे, बैसाखु जनबंधु, प्रकाश चाफले, चंद्रशेखर बावनकुळे, शिवाजी चकोले, महेश झोडावणे, राहुल टेकाम, ग्रा.पं.सदस्या आशाताई कनोजे, दुर्गाताई सरोदे, सिंधुताई वाघमारे, अरूणा हजारे, अरूणा पोहरकर, वर्षा खडसे, मोनाली वरले आदीने उपस्थित राहुन रितेश ला लॅपटॉप सप्रेम भेट म्हणुन त्याच्या स्वाधिन केला.