मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना, विदुषी पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
“पद्मभूषण डॉ कनक रेळे यांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार व संशोधनासाठी समर्पित केले. मोहिनीअट्टम तसेच कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत होत्या. ’नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले, नृत्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवले तसेच मूलभूत संशोधन केले. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एका महान नृत्य तपस्विनीला गमावले आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.