संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 13 :- कामठी रेल्वे मार्गावर प्रेमी युगलांनी हातात हात घालून रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना गतरात्री घडली असून या चर्चेला विराम मिळत नाही तोच 24 तासाच्या आत ड्रॅगन पॅलेस भुयार पूलीया रेल्वे मार्गावरील रेल्वे की मी क्र 1115/2729 अप रेल्वे लाईन जवळ काल रात्री साडे नऊ दरम्यान सैलाब नगर रहिवासी एका 50 वर्षीय इसमाने कामठी कडे येणाऱ्या कंटेनर रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून मृतक इसमाचे नाव बबलू छोटेलाल कुरील वय 50 वर्षे रा सैलाब नगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नसले तरी मृतक बबलू कुरील नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सैलाब नगर येथे एकल जीवन जगत होता , मृतकाच्या कुटुंबीय सदस्यांची कुठलीही माहिती नसून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
अजून एका इसमाचा रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com