महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ :- वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतात. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्याचा निर्णय इतर बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या स्तरावर दिला जातो. पुरस्कारासाठी छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर पुरस्कार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच मे 2024 मध्ये देण्याचे प्रस्तावित आहे.

या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याकरीता वीरशैव लिंगायत समाजाच्या इच्छुक असलेल्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून दि.१५ मार्च पूर्वी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक मंगला मुन यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SCHOOL CHILDREN VISIT SITABULDI FORT

Wed Mar 6 , 2024
Nagpur :- Over 150 school children visited Sitabuldi Fort today, where the students were thrilled to gain valuable insights and learnt important historical facts about Fort & reasons of its fortification, etc. Students learnt about the Maratha dynasties and their purpose to establish a strong citadel to safeguard themselves from the British Empire. The spotlight of the Fort was the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com