कामठी शहरातील ट्राफिक बूथ अजूनपावेतो बेपत्ता, अनाथलयातील शालेय विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 27:-नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराचा नागपूर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर पोलिसांची कार्यप्रणाली ला अति वेग आला असून प्रत्येक विभागाशी संबंधित संलग्न कार्यालये करण्यात आली स्थानिक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक, सायबर सेल चे पोलीस निरीक्षक असे वेगवेगळे विभागाचे विभाग निरीक्षक वेगळे नेमल्या गेले आहेत.तर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 7 हा कामठी शहरातील लोकवस्तीतून जात असून या मार्गावरील वाढती वाहतूक वर्दळ सह वाढीव असलेले अपघाती मृत्यू लक्षात घेता माजी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून या मार्गाचे 754 कोटीच्या निधीतून दुपदरी रस्ता बांधकाम करण्यात आले तर या मार्गावरून सुरू असलेली वाहतुकीची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते. आज पाच वर्षांचा काळ लोटून गेला मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासन तसेच वाहतूक विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षितामुळे या मार्गावरील काढण्यात आलेले ट्राफिक बूथ पुनःश्च लावण्यात आले नाही .तर वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थिती मुळे अनाथलयातील शालेय विद्यार्थ्यांना मोटर स्टँड चौकातून जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.
कामठी नागपूर मार्गावर नोयमबाह्य पद्धतीने वाहतूक करणारे , तसेच बेशिस्त वाहतुकदारांना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलीस चौका चौकात उभे राहून नोकरी बजावत असतात मात्र येथील संवेदनशील चौक असलेले एसबीआय चौक, कामठी कळमना वळण मार्ग, हाकी बिल्डिंग चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया चौक, कमसरी बाजार पुलिया चौक तसेच साई मंदिर चौक पर्यंत अजुनपावेतो एकही वाहतूक ट्राफिक बूथ लावण्यात आले नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल., .हाकी बिल्डिंग चौक तसेच जयस्तंभ चौक व कामठी मोटर स्टँड चौकात ट्राफिक पोलीस उपस्थित नसल्याने वाहतुकदाराणा जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे. त्यातच नुकतेच काही महिन्यांपूर्वी जयस्तंभ चौकात नुकतेच घडलेल्या जीवघेणे अपघातात तरुण तरुणी जागीच मृत्यूमुखि पडले होते. घटना तसेच किरकोळ अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे..तेव्हा बेशिस्त वाहतूक दारांकडून जेव्हा कुण्या निर्दोष वाहतुकदाराचा बळी ची झडी लागेल तेव्हा या वाहतूक व नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
-स्थानिक पोलीस स्टेशन ग्रामीण पोलिस विभागाशी संलग्नित असल्याने मोटार स्टँड चौकात असलेल्या ट्राफिक बुथवर नेमून असलेले वाहतूक पोलीस खुद्द शालेय विद्यार्थ्यांचा हात धरून रस्ता ओलांडून देत असत मात्र आज कालांतराने परिस्थिती बदलली, रस्ता मोठा झाला, ग्रामीण चे शहर झाले मात्र शाळा तिथेच असल्याने या शाळेत शिक्षणासाठी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची संख्या कायम आहे मात्र या चौकात ट्राफिक बूथ सह वाहतूक पोलीस नसल्याने अनाथलायातून शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडवा लागत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

24 तास शुद्ध पाणी मिळण्याची वल्गना हवेतच विरली

Sun Mar 27 , 2022
संदीप कांबळे,कामठी तीन पानी टंकी निर्मितिचे काम संथगतीने कामठी ता प्र 27:- उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाळा म्हटला की शहरात दरवर्षी पाण्याची टँचाई जाणवते व सर्वत्र पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू होते या बाबी गांभीर्याने लक्षात घेत नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नाला आलेल्या यशातून कामठी नगर परिषद ला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!