– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 8:-भारतात मुंबई येथे जागतिक महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला असल्याचे मनोगत कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी आज 8 मार्च ला कामठी पंचायत समिती कार्यालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय कामठी येथे पंचायात समिती कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
सदर छोटेखानी कार्यक्रमास कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.