संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 15 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कॅन्टोमेंट येथील गार्डस रेजिमेंटल सेन्टर परिसरातील टेलिफोन केबल च्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्याने संधी साधून गोडाऊन ची मागची भिंत तोडून गोडाऊन मध्ये अवैधरित्या प्रवेश करून गोडाऊन मधील 6लक्ष रुपये किमतीचे केबल वायर चोरीला गेल्याची घटना आज निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी विवेक सुरेशचंद्र पुणेका वय 23 वर्षे रा जी आर सी कॅन्टोमेंट एरिया कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454, 457,461, 380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळी असलेल्या केबल वायर च्या गोदामात मोठ्या प्रमाणात साहित्य साठवून ठेवले असल्याची गुप्त माहिती चोरट्याना मिळताच चोरट्यानी गोदामच्या मागची भिंतिला भगदाड पाडून अवैधरित्या गोदाम मध्ये प्रवेश करून 6 लक्ष रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले व भिंत सुद्धा बंद केली .ही घटना 25 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान घडली असून सदर घटना आज फिर्यादी च्या निदर्शनास आली असता पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कामठी कॅन्टोमेंट परिसरात 6 लक्ष रुपयांची चोरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com