संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुका कृषी कार्यालय चे तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांची पदोन्नतीने वनामती नागपूर येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त ठिकाणी कुणाचीही नियुक्ती करण्यात आले नसल्याने हे तालुका कृषी अधिकारी पद मागील एक वर्षांपासून प्रभारी स्वरूपातच आहे.
कामठी तालुक्यातील खरीप पिकाचे नियोजन झाले असून शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आले असून पावसाळा ऋतूला सुरुवात झाली आहे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.अशा परिस्थितीत तालुक्यातील बहुतांश शेतकरी विविध योजनेसाठी कार्यालयात जातात मात्र तालुका कृषी कार्यालय मागील एक महिन्यापासून कुलुपबंद आहे तर ईतर अधिकारी ,कर्मचारी दौऱ्यावर असल्याचे निमित्त सांगून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने बहुतांश शेतकरी तालुका कृषी कार्यालयात चकरा मारताना दिसतात.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून तालुक्यात कायमस्वरूपी कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा कामठी तालुक्याला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.