नागपूर :- सनदी अधिकारी डॉ. अतुल पाटणे लिखीत ‘कल उनकी थी दिवाली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार 19 रोजी दुपारी 2.30 वाजता मधुरम हॉल, फतेचंद मोर हिन्दी भवन, राणी झांसी चौक येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमात रेमन मैग्सेसे पुरस्काराने सम्मानित डॉ. मंदाकिनी आमटे, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापड़कर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. प्रकाशनानंतर काही निवडक कवितांचे वाचन केले जातील. तरी रसिकप्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.