संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील पत्रकार मागील खूप वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत.मात्र त्यांच्यासाठी शासनाची कुठलीही योजना नाही. एवढेच काय तर आता शासनाच्या नियमाप्रमाणे वय वर्षे 58 वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारानासुद्धा अधिस्वीकृती नोंद नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही.कारण ते पत्रकार अधिस्वीकृती धारक नाहीत तेव्हा शासनाने याकडे लक्ष पुरवून विशेष भाग म्हणून पत्रकारांना योग्य तो न्याय द्यावा व अधिस्वीकृती बहाल करावी अशी मागणी कामठी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.