वाडी :- राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाडी परिसरातील सामाजिक संस्था टुगेदर वुई फाईट फाउंडेशन द्वारा बुधवारी १६ नोव्हेंबरला वाडी व ग्रामीण क्षेत्रात कार्यरत विविध प्रसार माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडी न.प.चे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, संस्थेचे संचालक राजकुमार वानखडे यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केले.तदनंतर संस्थाध्यक्ष राजकुमार वानखडे ने प्रमुख अतिथी प्रेम झाडे यांचा पुष्प रोपटे देऊन स्वागत केले व प्रस्तावनेत संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम संचालित करण्याची माहिती दिली.ग्रामीण क्षेत्रातील वार्ताहर आपली पारिवारिक जबाबदारी नोकरी, व्यवसाय इत्यादी सांभाळून समाजाला आपली सेवा समाजाला अर्पित करीत आहेत. पत्रकार दिवसाला त्यांच्या कार्याचा सन्मान करणे समाजाचे दायित्व असून टुगेदर वुई फाईट फाउंडेशनने हे दायित्व पुर्ण करण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेम झाडे,राजकुमार वानखडे, संस्था पदाधिकारी मंदा गणवीर यांच्या हस्ते क्षेत्रातील पत्रकार गजानन तलमले,सौरभ पाटील, प्रा.सुभाष खाकसे, विजय वानखडे, दिलीप तराळेकर, नरेशकुमार चव्हाण, ऋषीकुमार वाघ, नागेश बोरकर, विकास बनसोड इत्यादीचा पुष्प रोपटे, भेटवस्तू, मिठाई देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रेम झाडे ने डॉ. आंबेडकरांच्या लेखणीचे उदाहरण देत निष्पक्षपणे समाजाची सेवा प्रदान करणारे समाज प्रहरी पत्रकारांच्या कार्याची प्रशंशा केली व शासन प्रशासनात संतुलन व जनतेला न्याय देण्यासाठी प्रेस हे तिसरा डोळा असून सतर्क व जागरूक राहण्याचा आग्रह केला. कार्यक्रमात संस्था पदाधिकारी कर्मचारी नंदकुमार सोनुले, सुभाष जोशी, मंदा गणवीर, दीपक कोरे, सपना लाल, राहुल ढोके इत्यादी सहभागी होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार मीनाक्षी ढोके केले.
राष्ट्रीय पत्रकार दिवसा निमित्त वाडीत पत्रकारांचा सन्मान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com