प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

नवी दिल्ली :- प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त कमिशनर असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनी अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, तसेच खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवली आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.

ध्वजारोहण दरम्यान पुष्पवृष्टी करणार

26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतील त्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख यांना सोपविली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवणगाव वासियांसाठी मनसे उतरणार मैदानात

Fri Jan 24 , 2025
– शिवणगाव प्रकल्पग्रस्त गाव उठवण्यास स्थगिती देण्यात यावी नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे शिवणगाव प्रकल्पग्रस्त गाव उठवण्यास स्थगिती देण्यात यावी या मागणी करिता उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. जोपर्यंत शिवणगावातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलनात्मक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरू व शिवणगावासीवांना न्याय मिळवून देऊ असे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी उपजिल्हाधिकारी यांना संबोधित केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!