– शाळा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिघातील तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई
नागपूर :- शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिघातील पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्यांवर नागपूर महानगरपालिका आणि सदर पोलीस ठाणे यांच्याद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त(सामान्य) अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात 21 पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईकरून एकूण १,१०, ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त(सामान्य) अजय चारठाणकर यांच्या निर्देशानुसार, सहायक आयुक्त (पुवर्तन) हरीश राऊत यांच्या नेतृत्वात सदर पोलीस ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात अंतर्भुत शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानठेले व तंबाखू युक्त पदार्थ विक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक व संबंधित पोलिस ठाणेचे कर्मचारी यांच्याद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाई द्वारे सुरेश ट्रेडर्स यांच्याकडून जवळपास 5 हजार रुपयांचा तंबाखू, गुटखा, सिगारेट बीडीचा साठा जप्त करण्यात आला. तर शेख रोशन शेख आमीर शेख पान शॉप यांच्याकडून ४ हजार रुपयांचा मुद्ये माल जप्त करण्यात आला, रमेश पान शॉप पानटपरी वरून जवळपास २ हजार रुपयांचा सीगारेट बीडीचा साठा जप्त करण्यात आला. श्वेता चौरसिया, चौरसीया पान शॉप, यांच्याकडून 30 हजार रुपयांचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. व्हि.सी.ए. मैदान सिव्हिल लाईन येथील अनिल तिळेडे अनिल पान शॉप यांचाकडून ३हजार २०० रुपयांचा तंबाखू युक्त माल जप्त करण्यात आला.
तर मोक्ष शॉप उत्कर्ष बिल्डींग यांच्यावर कारवाई करून १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, राज फुड राज भाई यांच्यावर कारवाई करून १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेषराव पान शॉप या पान टपरी कारवाई करून ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अर्शदीन अमृत तुल्य यांच्यावर कारवाई करून ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमर शाही शॉप यांच्यावर कारवाई करून जवळपास ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समंद पान शॉप यांच्यावर कारवाई करून जवळपास २हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टेक्स मोक्ष शॉप यांच्यावर कारवाई करून जवळपास २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजय पार्डीकर सिव्हिल लाईन यांच्या शॉपवर कारवाई करून जवळपास १०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मागीलवार यांच्यावर कारवाई करून जवळपास ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भारत टी-स्टॉल यांच्यावर कारवाई करून १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एम.के. २५ यांच्यावर कारवाई करून ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यादव पान शॉप यांच्यावर कारवाई करून जवळपास १ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला, चौरसीया पान शॉप सदर यांच्यावर कारवाई करून जवळपास २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, रेमन्ड पान शॉप यांच्यावर कारवाई करून ३ हजार रुपयांचाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, राजा पान शॉप यांच्यावर कारवाई करून १५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शोबीब पान शॉप दुर्गा माता मंदीर, छावणी यांच्या पानटपरीवर कारवाई करून जवळपास ४ हजार रुपयांचे सिगारेट आणि अन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. असा एकूण १, १०४९०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेला माल हा नाका नं. १३ कॉटन मार्केट गोडाऊन येथे ठेवण्यात आलेला आहे.
शालेय विद्यार्थांनी गुटखा, तंबाखूजन्या पदार्थाचे सेवन करू नये, आपल्या आरोग्याला जपाचे असे आवाहन चारठाणकर यांनी केले आहे.