रामटेक :- वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय रामटेक अंतर्गत येणाऱ्या महाराजपुर बिट मधील उमरी शेतशिवारात दि. १६ जुलै सकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान वाघाने हल्ला करून सदानंद शेरकुरे रा. उमरी यांच्या जर्सी गायीला ठार केले. मृत गाय ही अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाची होती. तसेच दुसरी एक गाय या हल्ल्यात जखमी झाली असुन ती अंदाजे सहा ते सात वर्ष वयाची असल्याची माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिली. शेरकुरे यांनी नुकसान भरपाई ची मागणी केलेली आहे.
वाघाच्या हल्ल्यात जर्सी गाय ठार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com