नितीन लिल्हारे, प्रतिनिधी
विजेचा धक्का लागल्याने त्या युवकांचा गेला बळी
सालई खुर्द : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव/धुसाळा येथील ग्रामपंचायतचे सरपंच रामकृष्ण पुंडे यांच्या सांगण्यावरून रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावत असतांना खांबावरील विजेच्या ताराला हाताचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा खांबावरच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
त्या युवकांचा शव खांबावर लडकून असल्याचे माहिती होताच सरपंच रामकृष्ण पुंडे यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला त्यावेळी ग्रामपंचायतने गावातील खांबावरील पथदिवे लावण्यासाठी सांगितले होते, अशी माहिती त्यांनी दिली. हा ग्रामपंचायतचे नेहमी गावातील खांबावरील पथदिवे लावत असल्याचे व्हायलर रेकॉर्डिंग स्पष्ट झाले आहे.
महावितरण विभागाचे कर्मचारी यांचे दोष नसतांना त्यांना फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे त्या युवकाला खांबावर पथदिवे लावण्यासाठी खांबावर चढविले त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी महावितरण विभागाने केली आहे.
त्या मृतकाच्या कुटुंबाला ग्रामपंचायतीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
मृतक सुंदरलाल यादोराव कटरे हा सरपंच पुंडे याच्या सांगण्यावरून
ग्रामपंचायतीचे रोजंदारीवर पथदिवे लावण्याचे काम करायचा मात्र सरपंच रामकृष्ण पुंडे व मृतक हे कोणत्याही प्रकारचे महावितरण विभागाला सूचना न देता मनमर्जी प्रमाणे काम करायचे अशी चर्चा सुरू आहे.
पावसाळा असल्याने गावातील पथदिवे लावण्यासाठी सरपंचाच्या म्हणण्यानुसार तो मृतक नेहमी प्रमाणे ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा कार्य वीज प्रवाह सुरू असतांनाच अनेक दिवसांपासून करीत होता. पथदिवे लावतांना वीज कार्यालयाला त्याची सूचना देण्यात येत नव्हती असे समजते.
त्यामुळे गुरुवार दि. २१ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पथदिवे लावण्याचे कार्य करीत असतांनाच त्याला विजेचा जबर धक्का बसून त्याचा जागीच मृत्यु झाला.
घटनेची माहिती होताच सरपंच पुंडे हे ज्या डीपीवरून विघुत प्रवाह सुरू होता ते विघुत पुरवठा बंद केला. नवेगाव ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे त्या युवकांचा नाहक बळी गेल्याचे बोलले जात आहे.महावितरण विभागाला माहिती न देता पथदिवे लावण्याचे काम सुरू होते, आता महाविरण विभाग ग्रामपंचायतवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.