रामटेक :-महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद अभियान कांद्री, कोंढाळी आणि घारतवाडा ह्या गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन गावात करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या. जनसंवाद अभियानात रामटेक क्षेत्रातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.