योगनृत्य परिवार संजय नगरतर्फे जनजागरण रॅली

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजीत स्वच्छता अभियान लीग स्पर्धेअंतर्गत योग नृत्य परिवार संजय नगरतर्फे २७ नोव्हेंबर रोजी जनजागरण रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या जनजागरण रॅलीस आयुक्त विपीन पालीवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, गोपाल मुंदड़ा यांनी भेट दिली.

रॅली पुर्वी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयुक्त विपीन पालीवार, माजी उपमहापौर राहुल पावडे, गोपाल मुंदड़ा यांनी स्वच्छता व मानवी जीवन यावर आपले विचार व्यक्त केले.

केंद्र प्रमुख किरण तुराणकर यांनी कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक केले. याप्रसंगी योग नृत्य शिक्षिका निशा ठेंगरे यांनी कचरा व स्वच्छतेवर स्वरचित गीत सादर केले तसेच योग नृत्य शिक्षक नरेन्द्र फसाटे, संजय मडावी, सचिन मडावी यांनी पर्यावरण व प्लास्टीक बंदीवर पथनाट्य सादर केले. त्यानंतर ओला व सुखा कचरा वेगवेगळा ठेवावा व स्वच्छता राखावी या विषयावर जनजागरण रॅली काढण्यात आली.

या स्वच्छता मोहीमेत केंद्र प्रमुख किरण तुराणकर,नरेंद्र बारसागडे, अमोल रंगारी, वसंत आत्राम, सीमा मडावी, रसिका बारसागडे, अश्विनी साळवे, आशा गुरनुले, प्रिया फसाटे, सिंधु गुडधे, माधुरी हिरवानी, आशा दुपारे, मिना लांजेवार, जवादे, शेषकन्या रामटेके, वाकडे, माणीकपुरी, रक्षीये यांनी श्रमदान केले व मोहीम यशस्वी होण्यास मदत केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीसीएल अधिकारियों की सांठ-गांठ से खदान से माफिया कराते हैं कोयला चोरी, पुलिस ने किया 12 मीट्रिक टन कोयला जप्त

Fri Dec 2 , 2022
रामगड :- मांडू थाना इलाके में सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड की तापिन कोलियरी के खुली खदानों से कोयले की चोरी कर इसे पास के जंगलों में छुपा कर तस्करी किया जाता है.सूत्रों की माने तो पिछले कई सालों से यहां कोयला चोरी और तस्करी सेंट्ल कोल फिल्ड्स लिमिटेड के क्षेत्रीय प्रबंधक और क्षेत्रीय महाप्रबंधक की दयादृष्टी से भागीदारी के तहत किया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com