जय श्री राम च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

संदीप कांबळे, कामठी
-ठिकठिकाणी भव्य स्वागत व प्रसादाचे वितरण

कामठी ता प्र 10:-, भगवान श्रीराम जयंती उत्सव समितीच्या वतीने श्रीराम जयंतीच्या पर्वावर कामठीत निघालेल्या भव्य मिरवणुकीने कामठी शहर दुमदुमले ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले. गंज के बालाजी मंदिर पोलीस लाईन येथे सजविलेल्या रथावरील भगवान श्रीराम मूर्तीची माजी आमदार देवराव रडके याचे हस्ते पूजा, आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी श्रीराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जयराज नायडू, अशोक गुप्ता, बाल्या सपाटे ,दिनेश बील्लरवान यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते, फटाके ,डीजे ढोल, ताशाच्या गजरात निघालेली मिरवणूक कळमना टी पॉईंट ,जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, मेन रोड, जुने पोलीस स्टेशन चौक ,नेताजी चौक, बोरकर चौक, लाला ओली, फुलओली चौक, अग्रवाल भवन, जुनी ओली, सत्यनारायण चौक, पोरवाल चौक, फेरूमल चौक,शुक्रवारी बाजार, गांधी चौक ,गोयल टाकी चौक, शारदा चौक मार्गे नगर भ्रमण करीत पोलीस लाईन गंज बालाजी मंदिरात मिरवणुकीचे समापन करण्यात आले . मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले .मिरवणुकीत केसरी ध्वज घेऊन तरुण श्रीराम प्रभू च्या जयघोष करून नाचत होते .मिरवणुकीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया , एसीपी नयन अलूरकर यांचे मार्गदर्शनात जुनी कामठी व नवीन कामठी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,, वाहतूक पोलीस निरीक्षक नरेंद्र तागडे यांनी मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवंती होमियोपैथी क्लीनिक मधे साजरा झाला जागतिक होमियोपैथी दिवस

Sun Apr 10 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:-होमियोपैथी चे जनक डॉ सैम्युअल हैनिमन ह्यांचा जन्मदिवस जागतिक होमियोपैथी दिवस म्हणून आज येथील अवंती होमियोपैथी क्लीनिक जयस्तंभ चौक कामठी येथे होमियोपैथी डॉक्टरांनी साजरा केला. डॉ हैनिमन यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीच्या मीसेन या गावात झाला. त्यांनी एम डी झाल्यानंतर वैद्यकीय सराव सुरु केला, अभ्यासु असल्यामुळे त्यांना अवगत झाले की एखाद्या जुनाट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com