परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असा समाज,देश निर्माण करण्याचा संकल्प करणे गरजेचे – माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कर्मवीर दादासाहेब कुंभारे स्मूर्तिदिनानिमित्त अभिवादन

कामठी :- बिडी कामगारांचे हृदय सम्राट व माजी सांसद सदस्य कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांनी आपले संपूर्ण जिवन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी त्यांनी खर्ची घातले,या चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या हातातून घेतलेली मशाल तेवत ठेवली पाहिजे तसेच खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असा समाज, देश निर्माण करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांच्या शांती,मैत्री व मानवकल्यांणकारी विचाराच्या आधारावर हा देश कसा पुढे नेता येईल व त्यासाठी आपले काय योगदान राहील असा संकल्प करणे गरजेचे असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे ऍड सुलेखा कुंभारे यांनी कर्मवीर ड्रॅगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसर स्थित कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी मोठ्या संख्येत धम्मसेवक, धम्मसेविकागण तसेच पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.

कर्मवीर ऍड नारायण हरी कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा जन्म बिडी उत्पादनाचे प्रमुख केंद्र असलेल्या कामठी शहरात 23 मार्च 1923 रोजी झाला.तर 14 ऑक्टोबर 1982ला ऍड दादासाहेब कुंभारे यांचे दुःखद निधन झाले. दादासाहेब कुंभारे यांच्या 41 व्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसरात विविध अभिवादनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमा अंतर्गत 14 ऑक्टोबर ला सकाळी 9 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली व तदनंतर सकाळी साडे नऊ वाजता कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला ऍड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले तसेच उपस्थित पदाधिकारी , मान्यवर मंडळी व कार्यकर्तेगन तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंच, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती कामठी यासह धम्मसेवक ,धम्मसेविकानी माल्यार्पन करून अभिवादन वाहले.

याप्रसंगी अभिवादन वाहणाऱ्या समस्त उपस्थितांनी समाजाच्या सर्व आघाड्यावर प्रमुख भूमिका वठवून आपल्या बहुगुणी नेतृत्वाने समाजाच्या विकासासाठी त्यांनी उभारलेले कष्ट समाज कधीही विसरू शकणार नाही.कर्मवोर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनकाळातील भरीव कार्य भारतीयांच्या चिरस्मूर्तीत सदैव कायम राहील अशी अभिवादनिय कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच या अभिवादन कार्यक्रम अंतर्गत एमटीडीसी हॉल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले ज्यामध्ये शेकडोच्या वर लाभार्थ्यांनी नेत्रतपासनी करून घेतली यावेळी चष्मे सुद्धा वितरित करण्यात आले. व आधार कार्डचे नुतनीकरण करून आयुष्यमान कार्ड चे वितरण करण्यात आले .तसेच दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात युवा सक्षमीकरण व रोजगार मार्गदर्शक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये सूक्ष्म,मध्यम,लघू उद्योग केंद्र नागपूर,रोजगार व कौशल्य विभाग नागपूर, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग कमिशन नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे तर उदघाटक म्हणून महाराष्ट्र राज्य स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपूर च्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज होत्या तर प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म ,लघु,मध्यम मंत्रालय नागपूर चे सहाय्यक निदेशक राहुलकुमार मिश्रा,खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन नागपूर च्या जिल्हा समन्वयक निशा सोनेकर,सामाजिक न्याय विभाग नागपूर चे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड,जिल्हा उद्योग केंद्र नागपूरचे इंडस्ट्री इन्स्पेक्टर मनोहर मेश्राम होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र,ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,ओगावा इंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड आदींनी मोलाची भूमिका साकारली..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज - अनुप डोंगरे

Sun Oct 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- संत तुकडोजी महाराजांनी सांगीतल्यानुसार ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ही म्हण कायम लक्षात घेत वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असे मौलिक प्रतिपादन फ्युचर युथ फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष अनुप डोंगरे यांनी नवयुवक उच्च प्राथमिक शाळा परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com