बुट्टीबोरी :- अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावरील मौजा सातगाव फाटा, चंद्रपुर ते नागपूर रोड येथे दिनांक०१/०५/२०२३ चे ०४.३० वा. सुमारास फिर्यादी नामे अन्नार त्रिनिवास मल्लया, वय ३० वर्ष, रा. बित्तापुर ता. नन्नल जि. मंबीराल तेलंगणा हा त्यांच्या मालकाची बोलेरो पिकअप गाडी क्र. टी. एस. ०१ यु. पी. ६०४१ ने क्लीनर राधाअंडी मल्लेग राजया, वय २८ वर्ष रा. बोयापल्ली मंचीगल तेलंगणा व आंब्याचे बगिचाचे मालक नामे- जयारपु विजय पुनम, रा. नन्नल मॅचीराज तेलंगणा यांचेसह गाडीत आंबे भरून कळमना मार्केटला जात असतांना बुट्टीबोरी उड्डाणपुलाचे समोर सातगाव फाटा जवळ एक लोडींग ट्रक क्र. एम. एच. ४० ए के १४९७ चा आरोपी चालक हा रोडवर पार्किंग लाईट न लावता उभा होता. अंधार असल्याने फिर्यादीची बोलेरो गाड़ी इकला मागुन धडकली बोलेरोचे कॉवन मध्ये तिघेही फसले होते लोकांनी त्यांना दवाखाण्यात नेले. तेथे डॉक्टरांनी क्लीनर राधाअडी याला तपासून मृत घोषीत केले व फिर्यादी व आंब्याचे बगीचाचा मालक हा जखमी होण्यास आरोपी ट्रकचालक हा कारणीभूत ठरला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. बुट्टीबोरी येथे आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, २३८, ३०४(अ) भादवी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोहवा कुणाल पारची मो. क्र. ७७४१०२२७३१ हे करीत आहे.