कार -दुचाकी अपघातात इसमाचा मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पासीपुरा पुलियाजवळ कार दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जख्मि घेऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर जख्मि दुचाकीस्वारसहपाठी असलेला तरुण उपचारा दरम्यान मृत्यू पावल्याची घटना गतरात्री दीड दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव प्रशांत भोजराज पंचभाई वय 46 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.तर जख्मि दुचाकीस्वार तरुणाचे नाव प्रवीण मेश्राम वय 35 वर्षे रा आंबेडकर नगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक प्रशांत पंचभाई व जख्मि प्रवीण मेश्राम हे मरारटोली येथील एका खानावळीत खाजगी स्वरूपात नोकर म्हणून कार्यरत होते .नेहमीप्रमाणे नोकरी आटोपुन बजाज दुचाकी क्र ए पी 10 ए ए 1812 ने घरी जात असता विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्र एम एच 40 बी जे 4817 ने सदर घटनास्थळी दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातातून दुचाकीस्वार गँभिर जख्मि झाले असता दोन्ही जखमींना नजीकच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ हलविले असता यातील एकाची परिस्थिती नाजूक असल्याने नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादारम्यान सदर इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली यासंदर्भात जख्मि फिर्यादी प्रवीण मेश्राम ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कारचालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकुने हल्ला, परिसरात खळबळ

Sat Nov 19 , 2022
दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, एका आरोपिला अटक, एक फरार.   कन्हान : – शहरात असामाजिक तत्वाचा दिवसेदिवस बोलबाला वाढुन आरोपी पकडण्याकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोन आरोपींनी चाकुने हल्ला करून पोलीसाला जख्मी केल्याची धक्कादायक घटना कन्हान शहरातील आंबेडकर चौकात घडल्याने परिसरात एकच खळखळ उडत भीतीचे वातावरण निर्माण होत पोस्टे कन्हान अंतर्गत शांती सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com