संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कर वसुली नगर परिषदचे मुख्य उत्पन्नाचे साधन असून मागील काही दिवसांपासून कामठी शहरात वाढीव मालमता कराचा विषयाला मोठ्या प्रमाणात उधाण आले असून या वाढीव कराचा विरोध दर्शवित ही करवाढ नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप करीत बरीएम चे अजय कदम यांनी नगर परिषद प्रशासनाला वेठीस धरले त्यानंतर इतरही राजकीय पक्षांना जाग आल्यानंतर ही करवाढ जनमानसात चर्चेचा विषय ठरत सर्वांनी या वाढीव कराला विरोध दर्शविला ज्यात या करवाढिला नगर परिषद प्रशासनाला धारेवर घेण्यात येत असले तरी नाण्यांचे दोन्ही बाजूने विचार केल्यास नगर परिषद प्रशासनाने ही करवाढ नगर परिषद च्या सभागृहात मंजूर झालेल्या विषया नंतरच करण्यात आली.या करवाढीच्या प्रस्तावाला 21 डीसेंबर 2021 च्या विशेष सभेत माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम,प्रतीक पडोळे व मो आसिफ या तीन नगरसेवकांनी विरोध दार्शविला तर इतर नगरसेवकांनी समर्थन दिल्याने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यानंतर ही करवाढ करण्यात आली तेव्हा या वाढीव कराला स्थानिक नगरसेवकच जवाबदार असल्याची वास्तुस्थिती नाकारता येत नाही.तेव्हा स्थानिक नागरिकानी पूर्वीपेक्षा चार पट ,पाच पटीने आलेल्या कर वाढिला नगर परिषद प्रशासनाला धारेवर घेण्यासह प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या नगरसेवकांना ही वेठीस घेणे गरजेचे आहे.
कामठी नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या अध्यक्षतेखाली 21 डिसेंबर 2021 ला झालेल्या विशेष सभेत विषय क्र 6 अनव्ये कामठी नगर परिषद च्या हद्दीतील मालमत्तांचे भांडवली मूल्यानुसार कर निर्धारण आकारणी करण्याकरिता मालमत्ता कर,शिक्षण उपकर,रोजगार हमी उपकर,वृक्ष कर,अग्निशमन कर यांचे दर तसेच बहुविध भारांक निश्चित करणे, व मंजुरी देण्याबाबत विचार व विनिमय करून निर्णय घेणे या विषयावर झालेल्या सभेतील मंजूर ठरावानुसार 3 नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्र 16 अनव्ये कामठी नगर परिषद क्षेत्रातील मालमत्तांचे मालमत्ता कर पुनर्मुल्यांकन भांडवली मूल्यानुसार मंजुरी करण्यास मंजुरी दिलेली आहे.त्यानुसार प्रसिद्ध केलेल्या मंजुरीनुसार सदर काम हे मे.कोलबो ग्रुप नागपूर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार दरास मंजुरी व बहुविध भारांक यास मंजुरी देण्यात आली त्यानुसार एकत्रित मालमत्ता कर (करपात्र भांडवली मूल्याच्या)0.24टक्के,वृक्ष कर 0.015टक्के,अग्निशमन कर 0.020टक्के,घनकचरा शासन नियमानुसार ला मंजुरी देण्यात आली.तसेच सन 2013 पूर्वी बांधण्यात आलेल्या निवसी इमारती ज्या 500 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी आहेत त्यांच्याबाबतीत मालमत्ता करात कोणतीही वाढ करता येणार नाही .अश्या विविध बाबींचा समावेश आहे.पण वास्तविकता आता नगर परिषद तर्फे आलेली फेर कर नोटीस मध्ये पूर्वीच्या तीपटीपेक्षा जास्त कर वाढ निदर्शनास आलेली आहे त्याबाबतीत नगर परिषद तर्फे आक्षेप जरी मागितले असले तरी ही करवाढ नागरिकांच्या अवाक्याबाहेर आहे.त्यातच नागरिकांनी आता स्वतःचे संसाराचा गाढा चालवण्यासह कामठी नगर परिषद प्रशासनाच्या संसाराचा गाढा चालविण्याची जवाबदारी या वाढीव कराचा भरणा करून स्वीकारावी का?असाच प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.
वास्तविकता दर चार वर्षांनी कामठी नगर परिषद तर्फे असेसमेंट केले जाते त्यानुसार मालमत्ता कराची वाढ केली जाते मात्र 2012 पासून नगर परिषद तर्फे शहरात असेसमेंट केलेच नाही तर आता भरमसाठ करवाढ केली आणि त्यालाही येथील स्थानिक नगरसेवकांनी समर्थन दर्शविला. तर फक्त तीन नगरसेवकांनी रघुवीर मेश्राम, प्रतीक पडोळे व मो आसिफ यांनी विरोध दर्शविला मात्र बहूमत असल्यामुळे यांच्या विरोधाला केराची टोपली दाखविण्यात आली व सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला.तेव्हा येथील जागरूक नागरीकानी या करवाढिला नगरसेवकांनी कशी मंजुरी दिली? याचा जाब विचारणे तितकेच गरजेचे आहे.