संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– योग हा शरिरातील गुण विकसित करून जीव नाचा दर्जा उंचावतो – ज्ञानप्रकाश यादव
कन्हान :- बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्य क्रीडा शिक्षक माधव काठोके यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी, शिक्षक व शिक्ष केत्तर कर्मचारी यांनी योगासने आणि प्राणायाम यांचा अभ्यास केला. योग, एक परिवर्तनकारी सराव, शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते, आरोग्याच्या कल्या णासाठी सर्वांगिण दृष्टीकोन देते, ज्यामुळे आपल्या व्यस्त जीवनात शांतता येते.
नियमितपणे योग व्यायाम केल्याने तणावाचे व्यवस्थापन, लवचिकता वाढते, शरीर मजबुत होते व दीर्घकाळापर्यंत भावनिक स्थिर ता, लक्ष केंद्रित आणि सकारात्मकता निर्माण करण्या स मदत होते. योग हा शरिरातील गुण विकसित करून जीवनाचा दर्जा उंचावतो. असे प्रतिपादन मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन कर तांनी संबोधित केले. याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्या ध्यापक राजेंद्र खंडाईत, यतीन पशीने, लता काथवटे, अमित थटेरे, योगी चौकसे सह विद्यार्थी, शिक्षक, शिक्ष केत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.