राज्य माहिती आयुक्तालयातर्फे २९ सप्टेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस’

नागपूर :- माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा राज्यात लोकाभिमुख झाला असून या कायद्याचे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘माहिती अधिकार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने येथील राज्य माहिती आयुक्तालयात शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येत आहे.

जूने सचिवालय परिसरातील नवीन प्रशासकीय भवन, पहिला माळा येथे ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस’ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थिती साजरा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती आयुक्त राहुल पांडे राहणार असून मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘माहितीचा अधिकार जनतेचा अधिकार’ याअंतर्गत नागपूर विभागात सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन, इमारत क्रमांक दोन, पहिला माळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य माहिती आयुक्तालयाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादन

Tue Sep 26 , 2023
मुंबई :-एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक , प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास , ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन काणे , प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते शिवराय कुळकर्णी , ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते . Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com