जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई ;राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी – महेश तपासे

मुंबई :- आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यघटनेच्या संरक्षणार्थ आवाज उठवणारे लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे – फडणवीस सरकारने दाखल केला आहे. ज्या महिलेने व्हिडीओ दिला आहे तो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्यात इतकी गर्दी आहे की, स्वतः वाट काढत आणि पोलीसही त्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांना बाजुला करत आहेत हे दिसत आहेत. त्यात ती महिलाही आहे. अशावेळी विनयभंगाचा गुन्हा होतो का हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जितेंद्र आव्हाड हे आवाज उठवत आले आहेत. भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे हात लावून कुणाला बाजूला केले असेल तर तो विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो का? याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आधी करुन घ्यावी असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंदिरा गांधी लोअर इंग्लीश स्कूल में सेवानिवृत्त शिक्षक सत्कार

Tue Nov 15 , 2022
वाडी :- दन्तवाडी स्थित इंदिरा गांधी लोअर इंग्लीश स्कूल मे सेवानिवृत्त शिक्षक सत्कार कार्यक्रम 9 नोव्हेंबर बुधवारको स्कूल के शिक्षक सुरेश बावनकर का सत्कार स्कूल के संचालक तथा जनककल्याण बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष गजानन तलमले इनके हाथो शाल , पुष्प गुच्छ और नारियल देकर किया गया सत्कार को उत्तर देते हुए बावनकर सर ने बाताया की स्कूल को कभी भूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com