माजी खासदार प्रकाश जाधव यांचे नेतृत्वात आंदोलन.
रामटेक – रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांच्या घेतलेल्या भूमिके च्या विरोधामध्ये रामटेक येथे आंदोलन करण्यात आले होते. लोकसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कन्हान ते गांधी चौक रामटेक असा 25 किलोमीटर पर्यंतचा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. आमदार आशीष जैस्वाल यांच्या घेतलेल्या भूमीके वरून आतापर्यंत ग्रामीण भागातून निषेध किंवा समर्थनार्थ कुठलीही प्रतिक्रिया बंडाच्या चार दिवसा पर्यंत आल्या नव्हत्या परंतु आता निषेधाची ठिणगी पडू लागली असल्याने माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. निषेध मोर्चा मध्ये प्रकाश जाधव यांचे नेतृत्वात शेकडो संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते. माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी घेतलेल्या बैठकीत निषेध करण्याच्या एकमताने निर्णय झाले असल्याने मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.