नागपूर :- मागील अनेक वर्षे राजकिय व सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकिय गुन्हे आहेत. परंतु ते गुन्हे निकाली काढल्या जात नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला शासनाने व्यवस्था केल्या नंतर देखील वारंवार कोर्टाच्या पायऱ्या / पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतात.
त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी मानद सचिव संदीप जोशी यांना निर्देष देवून या संबंधात पोलिस आयुक्त नागपूर यांचेसोबत बैठक घेण्यात यावी असे सांगीतले होते.
तरी अशी बैठक दिनांक 06 जुन 2023 रोजी पोलिस मुख्यालयात पार पडली. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेष कुमार, मा. उपमुख्यमंत्रींचे मानद सचिव संदीप जोशी, तसेच ॲड. उदय डबले, ॲड. अषिश भिडे, ॲड रितेष कालरा, ॲड. गिरीष खोरगडे, ॲड. परिक्षीत मोहीते, ॲड. अमोल कावरे तसेच पोलीस विभागाचे सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित होते.
ज्या व्यक्तींवर राजकीय व सामाजिक गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे ते सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अनुशंगाने शासनाने एक समीती गठीत केलेली असुन सर्व राजकीय व सामाजीक गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
नागपूर महानगराचे अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही पोलिस स्टेशन मधे ज्या व्यक्तींवर राजकीय किंवा सामाजिक गुन्हे नोंद असतील त्यांनी सोमवार ते शुक्रवार दुपारी 04.00 ते 06.00 दरम्यान माननिय उपमुख्यमंत्र्यांच्या देवगीरी येथील कार्यालयात उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिवांच्या नावाने अर्ज करावा असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी केले आहे.