नागपूर :- नागपूर महानगरपालिकेत कार्यरत २६९ ऐवजदार सफाई कामगार ज्यांची कडे मूळ ऐवजी कार्ड नाही परंतु, २० वर्ष सेवा झालेली आहेत अशा ऐवजदारांना अधिसंख्य सफाई कामगार पदावर नियुक्ती देण्याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार आदेश निर्गमित करण्यात आले आहे. अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेत कार्यरत ऐवजदार सफाई कामगार ज्यांची २० वर्ष सेवा झाली आहे व ज्यांच्याकडे ऐवजी कार्ड आहे. अशा कर्मचाऱ्यांना अधिसंख्य सफाई कामगार म्हणून मनपाच्या सेवेत सामावून घेण्याबाबत निर्देश प्राप्त होते. प्राप्त निर्देशाप्रमाणे अद्याप ३५०३ ऐवजदार सफाई कामगारांना शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार सामावून घेण्यात आले आहे. परंतु, ज्यांच्याकडे ऐवजदार कार्ड नाही आणि त्यांची सेवा २० वर्ष झालेली आहे. अशा ३३६ ऐवजदार सफाई कामगारांना लाभ देण्याबाबत विभागातर्फे सभागृहापुढे सादर करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या सभेने ठराव मंजूर करून शासनास पाठविले होते.
याबाबदल महाराष्ट्र शासन, नगर विकास यांचे दि. ७ / ९ / २०२२ चे पत्रान्वये, २० वर्षे सेवा झालेल्या परंतु, ऐवजी कार्ड नसलेल्या ऐवजदारांना अटी शर्ती आधिन राहून मनपा नागपूरच्या सेवेत सामावून घेण्याबाबत निर्देश प्राप्त झाले.
ऐवजी कार्ड नसलेल्या ३३६ ऐवजदारा पैकी काही ऐवजदारांनी मध्यन्तरी ऐवजी कार्ड जमा केले असल्याने त्यांना लाभ देण्यात आला आहे. आज उर्वरित २६९ ऐवजदार सफाई कामगार ज्यांची कडे मूळ ऐवजी कार्ड नाही परंतु, २० वर्ष सेवा झालेली आहेत अशा ऐवजदारांना अधिसंख्य सफाई कामगार पदावर नियुक्ती देण्याकरिता आदेश निर्गमित करण्यात आले आहे.