बार्टीच्या 2022 च्या पिएचडीच्या विद्यार्थ्यांना सारथी व महाज्योतीच्या तुलनेत फेलोशिप न देणाऱ्या राज्य सरकारचा अन्याय : संशोधक विद्यार्थ्यांचा आरोप

नागपूर :- अनुसूचित जातीच्या पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांचा पीएच. डी साठी प्रवेश होऊन आज 21 महिने झाले असून अनुसूचित जातीच्या बार्टीकडे अर्ज केलेल्या पिएचडी च्या 2022 च्या 761 विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासुन सरकसट फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी मागील 21 महीण्यापासुन विद्यार्थी संघर्ष करत असुन बार्टी कार्यालय पुणे येथे गेल्या 107 दिवसापासुन 2022 चे पिएचडी चे संशोधक विद्यार्थी नोंदणी दिनांकापासुन सरसकट फेलोशिपच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषण करत आहेत. या न्याईक मागणीसाठी मुंबई, नागपुर व पुणे या ठिकाणी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, उपोषणे करुणही विद्यार्थ्यांची रास्त मागणी असताना झारीतील शुक्राचार्य असलेले सामाजिक न्याय विभागाचे मंत्रालयीन सचिव सुमंत भांगे, बार्टीचे संचालक सुनील वारे हे कसल्याच प्रकारे विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भुमिका घेत नाहीत. वारंवार मागणी करुण राज्य सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विद्यार्थ्यांना न्याय देत नाही असा आरोप आज बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 चे संशोधक विद्यार्थी लालदेव नंदेश्वर, उत्तम शेवडे, योगिता पाटील, अंकित राऊत आदींनी आज एका पत्रपरिषदेत केला.

तर दुसऱ्या बाजुला सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दि. 21. 09. 2022 च्या पत्रानुसार 851 मुलांना विना परिक्षा सरसकट फेलोशिप मंजूर होऊन त्यांच्या खात्यात रक्कम ही जमा केली जाते. महाज्योती या फेलोशिप देणाऱ्या संस्थेकडे पाहिले असता ती संस्था पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांना 2022 मध्ये दि. 02.11. 2022 च्या पत्रानुसार 1226 विद्यार्थ्यांना विना परिक्षा सरसकट फेलोशिप मंजूर करून त्या फेलोशिपची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तसेच सारथी व महाज्योती च्या विद्यार्थ्यांची 2023 ची प्रक्रिया पुर्ण होत आली असतानाही, सारथी व महाज्योती संस्था विद्यार्थ्यांचा पिएचडी ला प्रवेश झाल्यावर जवळपास तिन महीण्यात प्रक्रिया पुर्ण करुण सरसकट 2022 च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देते. तर अनुसूचित जातीच्या 2022 च्या पीएच. डी धारक विद्यार्थ्यांना फेलोशिप देणारी बार्टी ही संस्था पीएच. डी धारकांचा प्रवेश होऊन 21 महिने झाले असले तरीही व गेल्या 107 दिवसापासुन उपोषण चालु असतानाही या महाराष्ट्रात बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय राज्य सरकार अद्यापही का? घेत नाही असाही सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

बार्टी ही संस्था दि. 29 डिसेंबर 2023 ला 2022 च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा रद्द म्हणून घोषना पञक काढते व दि. 2 जानेवारीला परत परिक्षा 10 जानेवारी 2024 ला परिक्षा रद्दच पञक रद्द करुण परिक्षा होणार हे घोषित करते. तर यापूर्वी घेण्यात आलेल्या दि. 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या फेलोशिप साठीच्या पुर्व परिक्षेत पेपर सिल फोडून सेंटरवर येतो व ति परीक्षा रद्द केली जाते. परंतु हे षडयंत्र करणाऱ्यावर कार्यवाही केली जात नाही.

पिएचडी ला प्रवेश होण्यासाठी पेट, सेट व नेट परिक्षा पास करुणच विद्यार्थ्यांचा पिएचडीला प्रवेश होतो. तर अजुन कोणती पाञता या बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांसाठी हे राज्यसरकार घेणार असा संतप्त प्रश्न विद्यार्थी करत आहेत. सारथी व महाज्योतीच्या 2022 च्या विद्यार्थ्यां प्रमाने विना चाळणी परिक्षा बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासुन सरकट फेलोशिप द्यावी ही विद्यार्थ्यांची मागणी असताना हे राज्यसरकार बार्टीचे महासंचालक सुनिल वारे व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या माध्यमातून बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांचा जातीवादी भावनेतून मानसिक छळ करत असल्याचे दिसुन येत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. सरकार जात बघून विद्यार्थ्यांना न्याय देणार का? असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

पिएचडीला प्रवेश होऊन 21 महीने झाले असता व बार्टीकडे विद्यार्थ्यांसाठी चा मुबलक पैसा असताना संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यात बार्टीकडून फेलोशिपची अद्याप दमडीही जमा करण्यात का? आली नाही. हे विद्यार्थी कामगार, अल्पभूधारक, शेतकरी, कष्टकरी, गरीब व मागासवर्गीय कुंटुबातील असल्याने संशोधन कसे करणार? संशोधनासाठी पैसा कुठून आणणार? या शैक्षणिक व आर्थिक अन्याया विरोधात बार्टीकडे अर्ज केलेल्या पीएच.डी. च्या 2022 च्या 761 संशोधक विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन दिनांकापासून वाढीव तरतुदीसह कागदपत्र पडताळणी करून तात्काळ सरसकट अवार्ड लेटर देऊन एका महिन्याच्या आत फेलोशिप सरसकट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. या मागणीसाठी विद्यार्थी लोकशाही मार्गाने मागणी करत असताना हे राज्यसरकार पक्षपाती, जातीयवादी, मनुवादी व हुकुमशाही पध्दतीने निर्णय घेताना दिसुन येत आहे.

आज बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 नागपूर विभाग नागपूर च्या पञकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की बार्टीच्या 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा न घेता विना विलंब सरसकट फेलोशिप देण्याची भुमिका घ्यावी. अन्यथा हा लढा तिव्र केला जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी राज्यसरकारची राहील. असा इशारा यावेळी बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती चे उत्तम शेवडे, लालदेव नंदेश्वर, योगिता पाटील, अंकित राऊत, नितीन गायकवाड, संदेश भिवगडे, प्रतीक झाडे, संदीप शंभरकर, ममता सुखदेवे, दिपाली गजभिये, शैलेश डोंगरे आदी संशोधक विद्यार्थ्यांनी दिला. या यावेळी अनेक संशोधक विद्यार्थी पत्र परिषदेला उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वतंत्रा सेनानी स्व. पंडित त्रियोगी नारायाण (जुग्गा महाराज) स्मृति सिनियर मार्निग हॉकी ग्रुप 7 ए साईड हॉकी प्रतियोगिता

Thu Jan 4 , 2024
*यूथ क्लब की एम सी इलेवन पर 5-7 की आसान जीत* *पैंथर्स ने मोतीपुर को 10-6 गोलो से पराजित किया।* राजनांदगांव :- सीनियर मॉर्निग हॉकी ग्रुप के द्वारा आयोजित सीनियर मॉर्निंग ग्रुप 7 ए साइड हॉकी प्रतियोगिता के तहत आज दूसरे दिन का पहला मैच यूथ क्लब विरुद्ध एम सी इलेवन के मध्य खेला गया मैच सुरुवात के पूर्व एलेक्सेंडर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com